Shocking Video Viral : तुम्ही घरात आत्तापर्यंत श्वान, मांजर, पोपट, ससा, कासव असे विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाळताना पाहिले असतील. पण, काही देशांत लोक सिंह, वाघ, चित्ता असे अनेक हिंसक प्राणी पाळताना दिसतात. लोकांना पाळीव प्राण्यांऐवजी हिंसक, जंगली प्राणी पाळणं आवडू लागलं आहे. अशाप्रकारे एका घरात चक्क एका सिंहाला बांधले होते. यावेळी एक चिमुकला त्या सिंहाबरोबर मस्ती करत होता. त्याने सिंहाची शेपटी पकडली. यानंतर असं काही गंभीर कृत्य केलं की पाहून तुम्हालाही भीती वाटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या चिमुकल्याच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच अशाप्रकारे प्राण्यांबरोबर क्रूरपणे वागणं योग्य नाही असे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका सिंहाला साखळीने एका घराच्या गेटजवळ बांधून ठेवले आहे. याचवेळी एक चिमुकला तिथे येतो आणि तो सिंहाची शेपटी ओढू लागतो. यावेळी तिथे उपस्थित काही लोक त्याचे हे कृत्य पाहून त्याला थांबवण्याऐवजी जोरजोरात हसू लागतात. पण, अखेर एक माणूस तिथे हसत हसत येतो आणि चिमुकल्याला तो सिंहाची शेपटी सोडण्यास सांगतो. याचवेळी चिमुकला अचानक खाली पडतो, यानंतर व्हिडीओ संपतो; पण नंतर पुढे काय घडले याबाबत कोणतीही माहिती नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

सिंहाचा हा संतापजनक व्हिडीओ @asifsherowala नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हटले की ही क्रूरता आहे, तर दुसऱ्या एकाने म्हटले की, अशा लोकांना पाळीव प्राण्यांना पाळण्याचीसुद्धा परवानगी दिली नाही पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, कोणत्याही प्राण्याला अशाप्रकारे त्रास देऊ नये, तर अनेकांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.