Lioness Attack On Buffalo Viral Video: सिंह कोणत्याच परिस्थितीत आपली शिकार सोडत नाही. ते आपल्या धारदार नखांनी मोठ-मोठ्या प्राण्यांना काही मिनीटांत फस्त करतो. मात्र प्रत्येक वेळी जंगलाचा राजा सिंहाला त्याच्या शिकारीत यश मिळेलंच असं नव्हे. कधी कधी ते शिकारी करण्यात अयशस्वी देखील होतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. सिंहीणीने आपल्या शिकारीसाठी पुरेपुर प्लान आखला होता. काही मिनिटांत शिकार करणार तितक्यात संपूर्ण डावच पलटून गेला आणि सिंहीणीला हार पत्कारावी लागली. यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
जंगलातील नियम आणि कायदे थोडे वेगळे असतात. इथे जिवंत राहण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. इथे दररोज कोणालातरी मरावंच लागतं. मात्र सिंहाचा दराराच वेगळा असतो. त्याच्यापुढे सगळेच फिके पडतात. सध्या याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगल परिसरात म्हशींचा कळप दिसून येतोय. त्यातली एक म्हैस एका उंच भागावर चढता चढता अडकली होती. अडकलेल्या या म्हशीला पाहून सिंहीण मागून हलक्या पावलांनी पुढे पुढे येत या म्हशीवर दबा धरून बसली होती. चोर पावलांनी म्हशीच्या जवळ येत म्हशीला आपली शिकार बनवण्याचा परफेक्ट प्लान या सिंहीणीने आखला होता. पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आणखी वाचा : साथीदारासोबत मस्ती करताना धाडकन पडलं हत्तीचं पिल्लू, हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच
सिंहीणीचा हा शिकारीचा डाव तिथे असलेल्या म्हशींच्या कळपाने चांगलाच हाणून पाडला. सिंहीण आपल्या कळपातल्या म्हशीवर हल्ला करणार हे जणू कळपातल्या इतर म्हशींना कळलं होतं. म्हणून सर्व म्हशींचा कळप त्या अडकलेल्या म्हशीच्या मदतीसाठी धावून आला. या म्हशींच्या कळपापुढे आता आपलं काही चालणार नाही, हे सिंहीण समजून गेली आणि तिथून पळ काढला.
आणखी वाचा : स्केटिंग एक्सपर्टलाही मागे टाकेल हा कुत्रा, VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : शिक्षक म्हणाले, “गाणं ऐकवा”, मग विद्यार्थ्यांनी जे केले त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा VIRAL VIDEO
सिंहीणीने म्हशीला जवळपास ताब्यात घेतलंच होतं, तितक्यात या म्हशींच्या कळपाने सिंहीणीला पळून लावलं. डोळ्याच्या पापण्या लवण्याआधीच व्हिडीओमधील चित्रंच बदलून गेलं. सिंहीण तिच्या शिकारीत हरू शकते , याची कल्पना कुणी केली नसेल. आता हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘नेचर27_12’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक याचा आनंदही घेत आहेत.