Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.गाडी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण वेग जास्त असेल तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे गंभीर अपघात देखील घडू शकतात. मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोकं वाऱ्याच्या वेगानं ओव्हरटेक करायला जातात, पण शेवटी त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.

Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Woman breaks glass door of society after catching security guard sleeping on dusty in greater noida shocking video viral
शेवटी तीही माणसंच! सुरक्षा रक्षकाचा लागला डोळा; अद्दल घडवण्यासाठी महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य?
aap mla amanatullah khan son
“मला लायसन्सची गरज नाही, माझा बाप…”, आप आमदाराच्या मुलाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी, वाहतुकीचे नियम मोडून म्हणाला…
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer Dance
Chhaava Trailer: ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले
Viral video of a woman dancing in torn clothes ashleel video viral on social media
“अगं जरातरी लाज बाळग”, एका रीलसाठी महिलेने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून राग होईल अनावर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीचा बाईकवरुन अपघात झाला आहे. यामध्ये अपघात झाल्यानंतर या व्यक्तीचे दोन्ही पाय जागेवर तुटल्याचं दिसत आहे. यावेळी या व्यक्तीला वेदनेनं इतका त्रास होतोय की पाहून कुणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. त्यामुळे स्पीडमध्ये गाडी चालवणाऱ्यांनो हा व्हिडीओ एकदा पाहाच.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. somna_thsingh_9118_babloनावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी नशीब एवढं बलवत्तर असेलच, असं नाही. रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची संधी देत नाही. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Story img Loader