प्रेम काहीही करायला प्रवृत्त करतं, असं म्हणतात. खऱ्या प्रेमात अनेकदा लोक आपली मर्यादा ओलांडतात. ते प्रेम मिळविण्यासाठी अगदी जीवाचं रान करतात. पण, अनेकदा त्यांच्या हाती अपयश येतं आणि याचा त्रास ते स्वत:ला तरी करून घेतात अथवा दुसऱ्याला देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेमात नेहमीच यश मिळेल हे काही सांगता येत नाही. अनेकदा परिस्थिती बदलते, तर अनेकदा माणसं बदलतात; पण यात गुरफटून न राहता, आपल्या सुंदर भविष्याचा विचार करणं हाच योग्य पर्याय ठरतो. पण, काही जण हा नकार पचवू शकत नाहीत आणि आपली हद्दच पार करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका प्रियकराने वरातीच्या वेळेस नवरदेवाची कारच फोडली.

हेही वाचा… तुम्हीच सांगा चूक कोणाची? एका हातात स्टेअरिंग अन्…; लहान मुलगा चालवतोय टेम्पो, पाहा थक्क करणारा VIDEO

नवरदेवाच्या कारची तोडफोड

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नासाठी सजवलेली नवरदेवाची कार काही जण फोडताना दिसत आहेत. सुरुवातीला दोन-तीन जण मिळून कारवर जोरात बाईक आदळतात. नंतर एक माणूस दगड आणि विटा घेऊन, कारच्या सगळ्या काचा फोडतो. नंतर अजून एक जण काठीने उरलेल्या सगळ्या काचा फोडतो. अशा प्रकारे नवरदेवाची सजवलेली कार काही जण उद्ध्वस्त करून टाकतात. प्रेयसीच्या वरातीत हा प्रकार घडल्याचं व्हिडीओतून कळतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @officialpathaan_with_shorts_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘लडकी की बारात पर प्रेमीने दुल्हे की गाडी फोडी’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २०.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही! दोन्ही पाय गमावले पण…, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “का कोणाचं लग्न खराब करताय, लग्नासाठी खूप पैसे खर्च होतात.” तर दुसऱ्यानं “असं करून काय फायदा, आता ती तुझी होणार नाही. एवढंच होतं, तर आधीच काहीतरी केलं पाहिजे होतं,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “याच्या वागण्यावरूनच कळतंय की, तिनं का दुसऱ्याबरोबर लग्न केलं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video lover broke the car of groom girlfriends husband viral video of ex heartbreak dvr