Tiger Shocking Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते हे उघड आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय.

मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून जंगलात गस्त घालत असताना पहारेकऱ्याची वाघाला चाहूल लागली. हा वाघ शिकार करण्याच्या उद्देशानंच जंगलात फिरत होता. यावेळी वाघ हल्ला करण्याच्या इराद्यानं हळूहळू पुढे आला. पण शेवटी गार्डनं पाहा डोकं लावून कसा स्वत:चा जीव वाचवला. सुरक्षा रक्षकाच्या हुशारी आणि कौशल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जवळच्या झाडावर चढून त्याने पटकन स्वतःला कसे वाघाच्या तावडीतून चवले तुम्हीच पाहा.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली, जेव्हा अन्नू लाल आणि दहल हे दोन सुरक्षा रक्षक उद्यानाच्या राखीव भागात नियमित गस्त घालत होते. अचानक झुडपातून वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्षक तात्काळ जवळच्या झाडाकडे धावला आणि जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा वाघ जंगलात फिरत आहे यावेळी झाडावर चढलेल्या सुरक्षा रक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यावेळी काही सेकंदासाठी असं वाटलं वाघ त्यांच्यावर हल्ला करणार. मात्र नंतर तो तिथून निघून गेला. पुढे हा वाघ काही वेळाने पुन्हा जंगलाच्या दिशेने जाताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “रावणाचा वध कुणी केला?” शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर चिमुकल्याचं भन्नाट उत्तर; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

या घटनेनंतर गस्तीदरम्यान अतिरिक्त खबरदारी घेण्यात येणार असून गस्ती पथकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ParveenKaswan नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २ लाख १६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.