Shocking Video: सोशल मीडियावर जगभरातील विचित्र घटना समजत असतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली घटना पाहून प्रत्येकजणांचा संताप होत आहे. एका नवऱ्यानं आपल्या बायकोला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बंद घरात हा व्यक्ती आपल्या बायकोचा छळ करत आहे. सुरुवातीला त्यानं तिला भींतीवर ढकललं नंतर तो तिला वर बघण्यासाठी सांगत होता. मात्र बायको मान खाली घालून उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी तो तिची मान वर करतो आणि तिच्या जोरात कानाखाली लगावतो. अतिशय निर्दयीपणे बायकोला कानशिलात लगावतो. त्यानं इतक्या जोरात तिला मारलं की ती अक्षरश: भींतीवर आपटते. यानंतर एक महिला त्या व्यक्तीला थांबवण्यासाठी मध्यस्थी करते मात्र तो तिचंही ऐकत नाही. तो तसाच आपल्या बायकोला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. यावेळी कुणीतरी लपून या घटनेचा व्हिडीओ काढला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम khanwali221 वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे कसलं प्रेम? या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या व्यक्तीवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, ” नवरा की हैवान?इतक्या टोकाला हे कसे काय जाऊ शकतात”