Shocking video: आपल्या आजूबाजूला अनेक लोकं सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्यक्तींना धुम्रपान करण्याची सवय असते. या व्यसनामुळे आपल्या जिवाला धोका असतो हे माहीत असूनही बऱ्याच व्यक्ती धूम्रपान करतात. तरुणाईमध्ये सिगरेट, तंबाखू, पान अशी व्यसने दिवसेंदिवस वाढत आसल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेक आपल्या अनोख्या शैलीने सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान तुम्हीही कधीतरी पाहिलं असेल की, सिगारेट ओढणारे लोक सिगारेट पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर टाकतात. मात्र असं करणं कसं जिवावर बेतू शकतं हे सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा सगळा प्रकार पाहून अनेक सिगारेट ओढणाऱ्यांना घाम फुटेल एवढं नक्की. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ही घटना आंध्र प्रदेशात घडली असून, एका व्यक्तीच्या धुम्रपानाची शिक्षा सर्वांना भोगावी लागली आहे. या व्यक्तीच्या एका चुकीने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका व्यक्तीने धुम्रपान करताना अनेक दुकानं आगीत जाळून खाक करुन टाकली. एका व्यक्तीने पाच लिटर पेट्रोल विकत घेतलं होते. पण तो दुचाकीवरून जात असताना कंटेनरमधून गळती झाल्याचं सांगण्यात आलं आहे. रस्त्यावर अनेक दुकानं असणाऱ्या ठिकाणीच ही गळती झाली होती. यावेळी तिथे अनेक वाहनंही उभी होती. यावेळी दोन व्यक्ती तिथे आले आणि दुकानाबाहेरच उभे होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे दोन व्यक्ती गप्पा मारत उभे असाताना त्यांच्यासमोर रस्त्यावर पेट्रोल सांडलें दिसत आहे. यादरम्यान एक व्यक्ती बिडी बाहेर काढतो आणि ती पेटवतो. यानंतर तो पेटती काडी रस्त्यावर फेकून देतो जी थेट सांडलेल्या पेट्रोलवर पडते. यानंतर क्षणात काही कळायच्या आतच आग पेटते आणि तिथे उभ्या दुकानं, गाड्यांनाही भस्म करते.

यानंतर स्थानिकांनी प्रसंगावधना दाखवल्याने अजून होणारं नुकसान टाळता आलं. या व्यक्तींनीही तिथे उभ्या असलेल्या गाड्या हटवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “स्वत:च्या बहिणीसाठी वाघ अन् दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला…” तरुणानं भर चौकात झळकवलेली पाटी पाहाच

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर @builder_majid नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून जोरदार व्हायरल होतोय. धूम्रपान करताना देखील काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे या व्हिडिओमधून समजते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video man caught fire due to a cigarette fire andhra mans beedi break sets ablaze shops vehicles caught on cctv srk