Viral video: चोरी करणारे लोक आणखी काय काय चोरी करतील काही सांगता येत नाही. गल्ली-बोळात चप्पलही चोरल्याच्या चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट चोरीची घटना दाखवणार आहोत, ज्यात कोणताही खजिना लुटला नाही, कोणत्याही मंदिरासमोरील चप्पल चोरी केली नाही किंवा कोणत्याही मंदिरातली दानपेटी चोरी केलेली नाही. आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना बघितल्या असेल ज्यामध्ये चोर घरातून मौल्यवान वस्तू चोरून नेतो. मात्र, सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. या विचित्र चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही चोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. या घटनेत चोराने चक्क महिलांचे अंतर्वस्त्र चोरल्याची बाब समोर आली आहे.
भोपाळ मध्ये एक चोर घराबाहेर सुकत घातलेली महिलांची अंतर्वस्त्र चोरत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या चोरीचे काही सीसीटीव्ही फूटेज वायरल झाले आहेत. ही ३-४ दिवसांपूर्वीची घटना आहे जी सोशल मीडीयात व्हायरल होत आहे. नागरिक सध्या स्वतः सतर्क राहून या चोरांवर लक्ष ठेवत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये हा चोर हेल्मेट घालून चोरी करायला येत असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती बाईकवरुन येतो आणि हेल्मेट घालून एका घराच्या आवारात प्रवेश करतो. यावेळी तो आजूबाजूला पाहतो आणि घराबाहेर असलेले महिलांचे अंतर्वस्त्र खिशात घालून निघून जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
news_bhopal नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. चार दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. अवघ्या चार दिवसात या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडिया यूजर्स देखील चोरीच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी तर या भन्नाट चोरीच्या व्हिडीओवर विनोदी मीम्स देखील शेअर केले आहेत. एका युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, “काय हा प्रकार,” तर आणखी एकानं म्हंटलंय, “अरे देवा हेच बघायचं बाकी आहे.”