Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका व्यक्तीने मेट्रो स्टेशनच्या छतावरुन थेट खाली उडी मारलीय. या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली परिसरातील महाराजा सूरजमल मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून एका ४९ वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. या व्हिडीओमध्ये हा माणूस मेट्रो स्टेशनच्या छतावर रेलिंगवर चढून बसलेला दिसत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी काही सुरक्षा कर्मचारी मेट्रो स्टेशनच्या खाली सतरंजी पकडून त्याला झेलण्यासाठी उभे आहेत. लोक त्या व्यक्तीला उडी मारू नका असे सांगत आहेत, मात्र हा व्यक्ती कोणाचेही ऐकायला तयार नाही. शेवटी एक जवान मागून येऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे येतो आणि हा व्यक्ती धमकी देत थेट खाली उडी मारतो. मात्र खाली उभे असलेले सुरक्षा कर्मचारी सतरंजी घेऊन उभे असल्यामुळे हा व्यक्ती रस्त्यावर न पडता सतरंजीवर पडतो. मात्र डोक्याला दुखापत झाल्यामुळे तो बेशुद्ध होतो. त्यानंतर त्याला संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी ही घटना आपल्या फोनमध्ये कैद केली. या वेदनादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरीश असे या व्यक्तीचे नाव असून तो इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘तुम्ही मुली आहात का रे?’ फुटबॉल सामना हरल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाडूंना लाथाबुक्यांनी तुडवलं; VIDEO व्हायरल
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
घर के कलेश नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… काय कारण असेल की त्या व्यक्तीला आपला जीव द्यावा लागला? दुसऱ्या युजरने लिहिले… ते कशा प्रकारचे लोक आहेत, ते मरण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचारही करत नाहीत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले … ही व्यक्ती कर्जदार असू शकते.