Shocking video: आजच्या काळात तरुणांमध्ये रील बनवण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. ऊठसूठ रील बनवण्यात सर्वच मग्न असलेले दिसतात. विषयाचं काही बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं आणि जागेचंही बंधन नसतं. हातात मोबाईल घेतला की लागले रील बनवायला. काही लोक तर रील बनवण्यासाठी स्टंटही करतात. अन् मग होत्याचं नव्हतं होतं. रीलसाठी जीवघेणा खेळ केल्यामुळे अनेकांना तर मृत्यूनेही गाठले आहे. स्वत:ला फेमस करण्याच्या नादात हा सर्व घोळ होत असतो.
सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकजण स्वत:ला फेमस करण्याचा प्रयत्न करत आहे. खासकरून इन्स्टाग्रामवरून स्वत:ला फेमस करण्यासाठी तर लोक वेडेपिसे झाले आहेत. कुठेही घुसून आणि रील बनवण्यात लोग मश्गूल झाले आहेत. आपण कोणत्या ठिकाणी आहोत, तिथे रील बनवणं किती सुरक्षित आहे हे सुद्धा हे लोक पाहत नाहीत. आपल्या जीवाला तर धोका होऊ शकत नाही ना? याची काळजीही हे लोक घेत नाहीत. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या जीवावर बेततं. आता हा व्हिडीओच पाहा. यात रील बनवण्याच्या नादात एका काकांचा अवघ्या ९ सेकंदात मृत्यू झाल्याचं दिसतंय.
क्षणात मृत्यूनं जाळ्यात ओढलं
या व्हिडीओमध्ये दिसत आहे, एका व्यक्तीने स्टंटसाठी रिक्षावर उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने तो व्यक्ती थेट जमिनीवर कोसळला आणि या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”