गणेशोत्सवामुळे सर्वत्र मगंलमयी वातावरण आहे. बाप्पाच्या दर्शनसाठी सर्वच भक्त आतुर आहे. सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा आणि दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येत आहे. भाविकांच्या गर्दीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लालबागाच्या राजासमोर सर्वसामन्यांबरोबर भेदभाव होत असल्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता जिथे एकीकडे व्हिआयपी लोकांना बाप्पाासमोर फोटो काढू देत निवांत दर्शन घेऊन देत होते तर दुसरीकडे तासने तास रांगेत उभे राहून सामान्य नागरिकांना बाप्पाच्या समोर जाताच ढकलून देण्यात येत होते होते. सामान्य लोकांना अशी वागणूक का दिली जाते यावर अनेकांनी रोष व्यक्त केला होता दरम्यान अशाच आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका सामान्य व्यक्तीला मूर्तीजवळ उभी व्यक्ती त्याला लाथ मारते. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडिओ कदाचित जुना असावा पण सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता बाप्पाची उंच मुर्ती पकडून एक व्यक्ती उभा राहिला आहे. काही लोक मुर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या रॅलीवर उभे किंवा बसलेले दिसत आहे. काही लोक या ट्रकला जाण्यासाठी रस्त्यावर वाट करून देत आहे. तेवढ्यात एक सामन्य व्यक्ती बाप्पाच्या मुर्तीला हात लावून दर्शन घेण्यासाठी येतो तेव्हा मुर्तीजवळ उभी व्यक्ती त्याला जोरात लाथ मारते. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. व्यक्तीच्या या कृत्याचा नेटकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
इंस्टाग्रामवर saakshichavan नावाच्या प्रोफाईलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना एकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”मनी नाही भाव आणि देवा मला पाव” देवाजवळ उभं राहायचं आणि त्याच्या भक्ताला लाथेने उडवून द्यायचं ही कसली भक्ती, देव सगळ्यांचा असतो हे हा माणूस विसरला. बरं झाला हा माणूस लालबागच्या राजाच्या सेवेला नाही, नाहीतर त्याने सगळ्यांना असेच वागवले असते”
तसेच मूर्तीजवळ उभे राहून स्वत:ला मालक समजू नका हे असेही लिहिले आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली, “मूर्तीजवळ उभा राहणारा मूर्ख माणूस आहे हा”
हेही वाचा – महेश बाबू अन् श्रीलीलाला ‘या तरुणींनी दिली टक्कर! साडी नेसून केला भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
दुसरा म्हणाला की, “माणसानेच माणसातील देव नाही ओळखला”
तिसरा म्हणाला की,”अरे ही काय माणसे आहेत….. देवा जवळ कसला भेदभाव करता…. देव अशाने खुश नाही होणार…. इतके पण समजत नाही का?”