Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे जी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.
दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. असाच एक व्यक्ती दारूच्या नशेत थेट विजेच्या तारांवर जाऊन झोपला. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ही घटना आंध्रप्रदेशमधील मन्यम जिल्ह्यातील एम. सिंगिपुरम या ठिकाणी घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका व्यक्तिला विजेच्या तारांवर झोपलेला पाहू शकता. समोर आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ति दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढत होता. दरम्यान गावकऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. शेवटी गावकऱ्यांनी विजेचा प्रवाह खंडीत केला त्यामुळे त्याचा जीव वाचला. अन्यथा झटका बसून काही सेकंदातच तो ढगात पोहोचला असता.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @TeluguScribe नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज गेले आहेत, तर अनेक यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने आश्चर्यचकित होऊन विचारलं आहे की, आधी तो माणूस खांबावर कसा चढला ते सांगा. त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, तो मद्यपान केल्यानंतर खरोखरच उडाला. आणखी एका यूजरने लिहिलं, ये है हस्ती का बस्ती ब्रो. याशिवाय, बहुतेक वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये इमोजी पोस्ट केल्या आहेत .