Shocking video: सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे सतत व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ चांगले आहेत तर काही खूप वाईट आहेत. आजकाल कोणी काहीही केले तरी लोक त्याचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर टाकतात. त्यातील काही व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल. कारण आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत या काकांनी असं काही केलं की तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काका कठड्यावर बसून समोर बसलेल्या मुलीकडे अश्लील नजरेने पाहत होते. तर कधी मुलीनं शॉर्ट स्कर्ट घातल्यानं तिच्या पायांकडे बघत होते. एवढंच नाहीतर पुढे त्यांनी तिचे फोटोही काढले. हे सगळं पाहून एका क्षणानंतर या तरुणीला हे सगळं असह्य झालं आणि ती त्या काकांकडे जाऊन तिनं त्यांचा मोबाईल तपासला. तर त्यांच्या मोबाईलमध्ये खरंच या तरुणीचे अश्लील फोटो काढले होते. यावर ते असं काही नाही असं काही नाही असं म्हणत फोटो डिलीट केले. यावेळी तरुणी संतापली असून देऊ का एक कानाखील असं म्हणत काकांना जाब विचारत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ thebollywoodgeek नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत. यावर एकानं म्हंटलंय की, तुमच्या मुलीच्या वयाची ना ती? तर आणखी एकानं हे कधी थांबणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.