Shocking video: प्रेम करताना वेळ, जागा कधीही पाहू नये असे म्हटले जाते. जसजसा काळ बदलला तसतशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आजकाल तरुण तरुणी कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता सार्वजनिक ठिकाणी नको ते चाळे करू पाहतात. सर्वांसमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू लागतात. असे करताना आजूबाजूच्या परिसराचा ते विचार करत नाहीत. प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर नेहमीच प्रियकर प्रेयसीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा ते नको ते चाळे करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळेतली विद्यार्थीनी शाळा बुडवून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली. दरम्यान त्यांचा हा सगळा प्रकार एका काकांनी पाहिला आणि काय केलं पाहा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. या आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत. असंच एक कपल शाळा बुडवून रोमान्स करताना दिसत आहे. एका शांत परिसारत ते उभे आहेत. यावेळी त्यांचा हा रोमान्स बाल्कनीतून एक काका पाहात होते. अन् त्यांनी या प्रेमी युगलांना पळवण्यासाठी जे काय केलं ते आता तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही एक मुलगी पाहू शकता जी आपल्या मैत्रीणीसोबत प्रियकराला भेटण्यासाठी आली आहे. हे कपल एका बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूस भेटायला आले आहे, शांत जागा असल्यानं त्यांना वाटलं आसपास कोणीच नाहीये. त्यांना शांतपणे रोमान्स करता येईल. पण पुढे जे झालं त्याचा त्यांनी विचारही केला नसेल. पहिल्या मजल्यावरून एक काका त्यांच्या या हालचाली पाहात होते. अन् मग काय, प्रेमी युगलांनी आपलं प्रेम व्यक्त करायला सुरूवात करताच त्यांनी पाण्यानं भरलेली बादली त्यांच्या अंगावर रिकामी केली. अचानक अंगावर पाणी पडताच तीघही घाबरले आणि क्षणाचाही विलंब न करता पळून गेले.
पाहा व्हिडीओ
शाळकरी विद्यार्थ्यांच्या या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सध्या वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात असून लोक यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला नक्कीच थक्क करतील.कपलचा हा लज्जास्पद व्हिडिओ viralvibes466 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत कपलच्या या कृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अशाप्रकारे पाणी टाकणं बरोबर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”कायदेशीर कारवाई करा आणि स्थानिकांनी धरून बडवा”. दरम्यान तुम्हाला काय वाटतं काकांनी बरोबर केलं का?