Viral video: जगभरातील देशांमधून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात फिरण्यासाठी येतात. येथील संस्कृती, इतिहास, राहणीमान जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. तसेच भारतीय पदार्थांची टेस्टही घेतात. हे पर्यटक व्हिडीओ तयार करून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करतात. अतिथी देवो भवः ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची किर्ती सातासमुद्राच्या पार पोहोचली आहे. त्यामुळेच शिवरायांनी जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी देश-विदेशातून नागरिक येत असतात. मात्र आपल्याकडचे काही लोक भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकांना त्रास देतात फसवणूक करतात. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एका पर्यटकाला तरुणानं चक्क तंबाखू खायला दिली..मात्र यानंतर त्याची जी अवस्था झाली ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर छत्रपती संभाजीनगरमधील काही पोरांनी एका न्यूझीलंडवरून आलेल्या तरुणाला शिव्या शिकवण्याचा संतप्त प्रकार समोर आला होता. आता याच पर्यटक तरुणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या परदेशी पर्यटकाला एका मराठी तरुणाने चक्क तंबाखू खायला शिकवण्याची बाब समोर आली. ही घटना मुरूड जंजिरा किल्यावर घडली होती.

दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा युट्यूबर एलेन जंजिरा किल्ल्यावर पोहोचला होता. तेव्हा तो एका तरुणाला भेटला. काही वेळ हा तरुण एलेन सोबत चालत होता. त्याला किल्ल्याची माहिती देत होता. किल्ल्यावर फिरत असताना नंतर तो थांबला आणि त्याने तंबाखू मळली. ही बाब एलेनने बघितली तेव्हा त्याने हे विचारलं हे काय खातोय. त्या तरुणाने ही तंबाखू आहे, तसंत माझ्याकडे पानमसाला सुद्धा आहे. याच्या पुड्याच काढून दाखवल्या, त्यानंतर या मराठी तरुणाने एलेनला तंबाखू खायची का, अशी विचारणा केली. त्यानंतर या तरुणाने तंबाखू मळून दिली आणि कसा खायचं हे देखील शिकवलं.तरुणाने दिलेला तंबाखू एलेनने खाल्ली मात्र त्याला ती सहन झाला नाही. या घटनेनंतर एलेन ने तंबाखू देणाऱ्या मराठी तरुणा पासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अक्षरशः त्याला चकवा देऊन पळून गेल्याचं देखील या व्हिडीओत बघायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ

दरम्यान सिंहगड किल्ल्यावर घडेलल्या प्रकारावर अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी हवेली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले की, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९, कलम ३०२ (जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी) यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास सुरू आहे.