Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये भयंकर अपघात समोर आला आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी झालेल्या धुळीच्या वादळानंतर चंदर विहार परिसरात एका इमारतीची भिंत कोसळल्याचे भयानक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भयंकर होता की याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. शुक्रवारी दिल्लीतील चंदर विहारच्या रस्त्यावरून लोक सहज चालत असताना ही घटना घडली. यावेळी एका वृद्धाचं एक पाऊल त्याच्या मृत्यूचं कारण ठरलंय. एका दागिन्यांच्या दुकानाजवळ येत असताना, इमारतीचा एक भाग वरून कोसळला आणि संपूर्ण परिसर ढिगाऱ्यांनी भरला. यावेळी इमारतीच्या छतावरून बांधकाम साहित्य पडल्याने एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर ये जा सुरु आहे, तेवढ्या वरुन पाच मजली इमारतीची भिंत खाली कोसळते, यावेळी हा ढिगारा एका वृद्ध व्यक्तीच्या आणि दोन तरुण आणि तरुणीच्या अंगावर पडतो. हे इतक्या अचानक घडतं की कुणालाच याची काही कल्पना नसते. यानंतर लोक जखमींच्या मदतीसाठी पुढे आलेले दिसत आहेत. एक व्यक्ती वृद्ध व्यक्तीला उचलण्यासाठी धावली पण तो आधीच मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो लगेच मागे हटला.
शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल झाला आणि जोरदार वारे वाहत होते यावेळी ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांना एलबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी चंदर पाल (६७) यांना मृत घोषित केले.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @news24tvchannel नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बघा मृत्यू कसा येऊन जाळ्यात ओढतो, एवढे लोक जात होते पण ते आजोबा तिथं आले तेव्हाच भींत कोसळली” तर आणखी एकानं खूपच भयंकर अशी प्रतिक्रिया दिलीय.