Shocking video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. ‘माय असे उन्हातील सावली, माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल, यावीत आता दु:खे खुशाल’ अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली, तर सैतानालाही धूळ चाखवू शकते. मग ती आई माणसाची असो वा प्राण्याची आई ही नेहमीच आई असते. याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे.

वाघाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे तसे कठिणच. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका अस्वलानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष. मात्र अस्वलानं ही हिम्मत त्याच्या बाळासाठी दाखवली आहे. वाघाच्या हल्ल्यापासून आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी अस्वलानं स्वत:चा जीव धोक्यात घातला. या आईनं आपल्या बाळाला कसं वाचवलं ते तुम्हीच पाहा. या व्हिडीओच्या शेवटी जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही.

chaturang article on Fear
इतिश्री : अशुभाची भीती
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Shocking video Stray Dog Suddenly Bites Man After He Pets It For A Minute, Dramatic Video
भयंकर! आधी प्रेमाने जवळ आला, व्यक्तीने हात लावताच थेट लचका तोडला; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघ हा अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता. पण तेवढ्यात त्याच्या आईनं वाघावर झडप घेतली आणि त्याला अक्षरश: पळवून लावलं.‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या अस्वलानं ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो” आजोबांची दमदार बॅटिंग पाहून झोप उडेल; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thinklight_jalpa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या अस्वलाचं कौतुक करीत आहेत. एकानं म्हटलंय की, आई ही आईच असते. दुसऱ्या एकानं कमेंट केलीय की, आईसारखा योद्धा संपूर्ण जगात नाही. शेवटी आणखी एकानं कमेंट केलीय की, शेवटी विषय काळजाचा होता.