Viral video: आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करीत असते; पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?
राग येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. आपल्याला दिवसभरातून अनेकवेळा अनेक गोष्टींचा राग येत असतो. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे.रागामुळे माणसाचा सर्वनाश होऊ शकतो. याचाच प्रत्यय या व्हिडीओतून आला आहे. यामध्ये एक आई आपल्या पोटच्या मुलांच्या जीवावर उठली आहे. तिला इतका राग आला की आपल्या मुलांनाच आपण मारहाण करतोय याचीही तिला जाणीव राहीली नाही.
अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईने आपल्या बाळाला इतक्या अमानुषपणे मारलं की, व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल. मस्ती करत असल्यामुळे या आईने आपल्या दोन मुलांना गळा दाबून जोरजोरात मारहाण केलीय. ट्रेनमध्ये सीटच्या खाली ढकलत ही महिला मारहाण करत आहे. यावेळी मुलं रडत आहेत मात्र तरीही त्या महिलेला दया येत नाही. आई होणं हे जगातील सर्वांत मोठं आणि सुंदर सुख असतं. नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करून आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं. त्यामुळे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो. मात्र, या महिलेचं कृत्य पाहून एक आई असं काही करू शकते यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DIMCrGJS1x_/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “पोटच्या लेकरांचा एवढा राग येतोच कसा?” तर आणखी एकानं, आई नाही ही वैरीण आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.