Fraudsters Replace QR Codes Shocking video: आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी, प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो. गूगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे सहज स्कॅन करून पेमेंट केलं जाऊ शकतं. हे करणं अतिशय सोपं आहे, क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. परंतु, कधीकधी पडताळणीशिवाय क्यूआर कोड स्कॅन करणंदेखील धोकादायक ठरू शकतं. अशातच फसवणुकीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हे एकूण प्रकरण पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

तु्म्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा… आम्ही असं का म्हणतोय ते तुम्हाला व्हिडीओ पाहून कळेल. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असू देत पोलिस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच मध्य प्रदेशच्या छतरपूरमधून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरांकडून चोरी करण्यासाठी चक्क डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या चोरांनी चक्क दुकानाचे क्यूआर कोड चोरून तेथे आपल्या अकाऊंटचे क्यूआर कोड लावले, ज्यामुळे दुकानदाराचे पैसे अगदी सहज चोराच्या अकाऊंटमध्ये जातात.

या चोरांनी लावलेलं डोकं पाहून सगळेच शॉक झाले आहेत. मध्य प्रदेशातील खजुराहो येथून हा प्रकार समोर आला असून जिथे चोरांनी रात्रीच्या वेळी विविध दुकाने आणि व्यावसायिकांनी दुकानाबाहेर ठेवलेले QR कोड बदलून ग्राहकांचे पेमेंट त्यांच्या स्वतःच्या खात्यात वळवले. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, एक तरुण दुकान बंद झाल्यावर मध्यरात्री दुकानाबाहेर लावलेले क्यूआर कोड काढतोय आणि स्वत:चे कोड लावतोय.

दरम्यान, दुकानदाराच्या हा प्रकार तेव्हा लक्षात आला जेव्हा ग्राहकांनी पाठवलेले पैसे त्यांच्या अकाऊंटला येतच नव्हते तेव्हा. तपासणी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, काही गुन्हेगारांनी अंधाराच्या आडून ऑनलाइन पेमेंट स्कॅनरमध्ये छेडछाड केली होती. पेट्रोल पंपांसह अनेक आस्थापनांमधील QR कोड बनावट आवृत्त्यांसह बदलण्यात आले आहेत याची पुष्टी पोलिसांनी केली. यानंतर गुन्हेगारांना पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.

पाहा व्हिडीओ

त्यामुळे अशाप्रकारे व्यवहार करताना प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे.

Story img Loader