Shocking video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्यातर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.
वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यातच पुन्हा एकदा अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात एका आलीशान कारच्या अपघाताचा थरार पाहण्यासाठी मिळाला आहे. मुंबईच्या वरळी येथील कोस्टल रोडवर सोमवारी वेगवान बीएमडब्ल्यू इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर जाऊन आदळली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार प्रथम पांढऱ्या वॅगनआरला आणि नंतर टोयोटा फॉर्च्युनरला वेगात ओव्हरटेक करताना दिसत आहे. ड्रायव्हर लेन क्रॉस करताना आणि नंतर उजव्या बाजूच्या दुभाजकात घुसताना दिसला. अपघातामुळे लक्झरी कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली, इतर लोक जखमी झाल्याचे वृत्त नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रकरणी चालकावर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @gallinews_com नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत.