Mumbai local viral video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही महिला डब्यात प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण महिला डब्यातही इतकी प्रचंड गर्दी असते की धड मुंगीला सुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. लहानपणी रेल्वेने प्रवास करायला मज्जा वाटायची आता त्याच रेल्वेला दोष देत रोज कामावर जायला लागतं. पण विचार करा.. जर मुंबईत लोकल बंद झाली तर? अहो मग जगणं मुश्कीलच नाही तर, अशक्य होऊन जाईल. असा हा रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि मस्त. जो प्रवास आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. जो रोजच करावा लागतो. तो सुखाचा व्हावा असं वाटणं साहाजिकच आहे. वेळेत पोहचण्याच्या नादात माणुसकी तर मागे राहत चालली नाही ना? लेडिजच्या डब्यात ‘आपलं ते सुख आणि तेरा तू देख’. असं व्हायला लागलं आहे.
असाच एक प्रकार नुकताच मुंबई लोकलमध्ये घडला आहे, ज्यात दोन महिलांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये जागेवरुन नाहीतर चक्क केसांमुळे वाद पेटलाय.
हो एका तरुणीला केस पुढे घे उडवू नकोस असं म्हणत एका महिलेनं भांडणाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. यावेळी तरुणी भडकते आणि माझे केस आहेत मी बघून घेईन असं प्रत्युत्तर देते. यावेळी दोघींमध्ये जोरदार राडा होतो, कुणीही कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इतर प्रवासीही या दोघींच्या भांडणानं त्रस्त झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
दररोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात, ज्यात विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी असतात. दगदगीच्या जीवनात रेल्वे प्रवास एक प्राधान्य ठरतो. यामध्ये अनेक वेळा काहीतरी वेगळं आणि नवीन पाहायला मिळतं. रेल्वेमधील भांडणं साधी नसतात, विशेषत: महिलांमधील वाद. काही वेळा या भांडणांमध्ये शाब्दिक चकमकीचं रूप घेतलं जातं, तर कधी त्या हाणामारीपर्यंतही पोहोचतात. ट्रेनचा प्रवास हे सामान्यांच्या आयुष्याचे एक रोजचे समीकरण झाले आहे. रोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात.
तुम्हीही ट्रेनचा प्रवास करत असाल तर भांडण हे तुमच्यासाठी काही नवीन नसेल. ट्रेनमध्ये वादाची ठिणगी पेटायला काही वेळ लागत नाही. त्यातही महिलांची भांडण म्हणजे काही खरे नाही.