Viral video: दररोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात, ज्यात विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी असतात. दगदगीच्या जीवनात रेल्वे प्रवास एक प्राधान्य ठरतो. यामध्ये अनेक वेळा काहीतरी वेगळं आणि नवीन पाहायला मिळतं. रेल्वेमधील भांडणं साधी नसतात, विशेषत: महिलांमधील वाद. काही वेळा या भांडणांमध्ये शाब्दिक चकमकीचं रूप घेतलं जातं, तर कधी त्या हाणामारीपर्यंतही पोहोचतात. ट्रेनचा प्रवास हे सामान्यांच्या आयुष्याचे एक रोजचे समीकरण झाले आहे. रोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात. कामाच्या गडबडीत आणि या धाकधुकीच्या जीवनात ट्रेनमध्ये अनेकांची अनेकांशी ओळख होते. यात कधी चांगले नातेसंबंध निर्माण होतात तर कधी रुसवे फुगवे सुरु होतात.
तुम्हीही ट्रेनचा प्रवास करत असाल तर भांडण हे तुमच्यासाठी काही नवीन नसेल. ट्रेनमध्ये वादाची ठिणगी पेटायला काही वेळ लागत नाही. त्यातही महिलांची भांडण म्हणजे काही खरे नाही. अशीच भांडणं डोंबिवली रेल्वे स्टेशनवर झाली ज्यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवासाची हवा बदलून जाते, आणि अशा भांडणांमुळे इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा घटनांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन महिला एकमेकींशी अक्षरशः एका वैरिणीप्रमाणे भांडताना दिसून आल्या. ट्रेनमध्ये सुरु झालेलं हे भांडण अक्षरश: डोंबिवली रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलं. यावेळी दोन महिलांच्या गटानं या दोघींना रोखून ठेवलेय. पण तरी देखील त्या काही ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत. दरम्यान हाणामारी झालेल्यांपैकी एक महिला म्हणतेय, मला फक्त एक मिनिट सोडा मी दाखवते मी कोण आहे तर दुसरी म्हणतेय, हिंमत असेल तर ये पुढे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ domumbai_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “एका दिवशी यामध्ये कुणाचातरी जीव जाईल” तर आणखी एकानं “आधी महिला प्रवासात पुरुषांपासून लांब राहायच्या आता महिलांना महिलांचीच भिती आहे” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.