Viral Video : तरुण मुलामुलींना जिमचे प्रचंड वेड असते. फिटनेससाठी अनेक जण दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशावेळी जिममध्ये व्यायाम करणे अनेकांना सोयीस्कर वाटते. जिममधील अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. सोशल मीडियावर जिममधील अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जिममध्ये व्यायाम करताना विशेष काळजी करणे आवश्यक आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिममधील एक धक्कादायक घटना दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (shocking video never do this mistakes while exercising in gym a young guy lost control on weight watch what happen next)
तरुणाचे वजनावरील नियंत्रण सुटले
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण वजन उचलताना दिसत आहे. अचानक त्याचा तोल जातो तेव्हा एक तरुणी मदतीला धावून येते पण तिचेही वजनावरचे नियंत्रण सुटते त्यानंतर ते वजन थेट या तरुणाच्या गळ्यात पडते. ही तरुणी वजन उचलण्याचा खूप प्रयत्न करते पण काहीही फायदा होत नाही पण ती तरुणी हार मानत नाही आणि वजन उचलण्याचा प्रयत्न करते. तो तरुण तिचा ड्रेस ओढून सीटवरून खाली पडण्याचा प्रयत्न करतो आणि तो खाली पडतो तेव्हा त्याच्या गळ्यातून वजन बाजूला सरकते आणि तो त्यातून बाहेर पडतो. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी कोणाच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
ghogavkarvijay7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “तुम्ही हे कधीही जिममध्ये करू नये. १६५ किलो”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मदत करणारी मुलगी तुला मानाचा सलाम तायडे” तर एका युजरने लिहिलेय, “ट्रेनर जवळ नसताना तुम्ही रीक्स का घेता?” आणखी एका युजरने लिहिलेय, “अंगावर शहारा येईल असा व्हिडिओ आहे हा” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. तर काही युजर्सनी हा व्हिडीओ ठरवून शूट केल्याचे लिहिलेय.