Shocking video: सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर आणि विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. असे व्हिडिओ काहीच वेळात इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यापैकी काही व्हिडीओ पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यात दिसतं, की एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कचऱ्याच्या पिशवीत बांधून फेकून दिलं आहे. आई म्हणजे देव. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी म्हण आहे. पण कधीकधी ही माता पोटच्याच मुलाची वैरीण होते. एका आईनं आपल्या पोटच्या बाळाला चक्क कचरापेटीत फेकलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.हा व्हिडीओ इतका भयंकर आहे ही तुम्ही पाहूही शकत नाही.
आपण २१ व्या शतकात आलो आहोत. मुलगा-मुलगी एकसमान अशा गप्पा केल्या जात आहेत. महिलांना सर्वत्र समान अधिकार दिले जात आहे. परंतु अजूनही मुलगा अन् मुलगी यांच्यातील भेद कायम असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. अशातच आता एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलीचा जन्म झाल्यामुळे नाराज झालेल्या आई-वडिलांनी तिला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण, सुदैवाने चिमुकलीचा जीव वाचला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कचऱ्यामध्ये एका सिमेंटच्या पशवीत नुकत्याच जन्मलेल्या बाळाला फेकून दिलं आहे. यावेळी ते बाळ रडत असल्यानं लोकांना आवाज आला आणि लोकांनी त्याला बाहेर काढलं. ही मुलगी असून तिला अशाप्रकारे बांधून कचऱ्यात टाकलेलं पाहू सर्वांनाच धक्का बसला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ajit.lavate97 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “डोळ्यातून पाणी आलं यार ज्याला पाहिजे त्याला देव देत नाही” तर दुसऱ्यानं “अरे बाळ वाचवणाऱ्यांनो बाळ बाहेर काढताना तरी नीट कडा रे किती जोरात पिशवी झटकावली किती लागलं असेल रे बाळाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं, “ज्याने या लक्ष्मीला नाकारले शप्पत सांगतो तो आयुष्यात ऐक ऐक घासला तरसेल. देवा ज्यांची लायकी नाही त्यांच्या घरात का जन्माला घालतो मुलींना” अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.