Shocking video : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. एका महाकाय अजगरानं नीलगाईच्या बछड्याची शिकार केली आहे. याचा सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल आणि त्यानंतर त्यामध्ये गावकऱ्यांनी जे केलं, ते पाहून धक्काही बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा अजगर जेव्हा लोकांना दिसला तेव्हा त्याचे पोट फुगले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. फुगलेल्या अजगराच्या पोटातून लोक गाईला बाहेर काढत आहेत. हा अजगर इतका फुगला आहे की, त्याला जागेवरून पुढे सरकताही येत नाहीये. अशा वेळी लोक वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेर शेवटी अजगराच्या पोटातून त्या नीलगाईच्या पिल्लाला बाहेर काढण्यात आलं. मात्र, एक जीव वाचवण्यासाठी पुन्हा दुसऱ्या जीवाला धोका पोहोचवण्यासारखा हा प्रकार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर टीकाही होत आहे. तुम्हाहा हे पटलं का ते आम्हाला नक्की कळवा.

जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. लहान साप लोकांना त्यांच्या विषाने मारतात; तर अजगरासारखे मोठे साप त्यांच्या भक्ष्याला गुंडाळून त्याची हाडं तोडून त्यांना जिवंत गिळतात. जंगलात राहणारे अजगर बहुधा लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात. पण आता माणसांनी जंगल तोडून, त्यात आपली घरं बनवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत महाकाय साप आता माणसांच्या जवळ पोहोचू लागली आहेत. याच कारणामुळे नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या अजगराच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” स्टंट करताना खांबाला धडकला अन् थेट रुळावर गेला; अंगावर काटा आणणारा Video

कोण बरोबर कोण चूक?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ IFS अधिकारी @ParveenKaswan यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये, “नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही स्थानिक लोक एका नीलगाईच्या बछड्याला अजगरानं गिळल्यानंतर वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्हाला काय वाटते? नैसर्गिक प्रक्रियेत अशा प्रकारे हस्तक्षेप करणे योग्य आहे का? किंवा त्यांनी योग्य गोष्ट केली का,” असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, खरोखरच तुम्हाला हे पटलं का? गावकऱ्यांनी केलेलं कृत्य बरोबर होतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.