Viral video: तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. तसेच तुम्ही कधीही कुणाची फसवणूक केली नसली तरी तुमची फसवणुक कुणीतरी करुन जातंच. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये तुम्ही गोष्टी कितीही ठरवून ठेवल्या असतील किंवा करायचा प्रयत्न केला तरी त्या ज्याप्रमाणे व्हायच्या तशाच होतात. तुम्हालाही असा कधी अनुभव आलाय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय तो व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “तुम्ही कितीही हुशार असला तरी नशिबात आहे ते होणारच”

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात काही रडवतात तर काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ जो पाहून तुम्हीही विचार कराल. एका तरुणासोबत अवघ्या सेकंदात जे घडलं ते पाहन तुम्हीही अवाक् व्हाल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं नेमकं घडलं तरी काय? तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. याच पाण्यात तरुणाची कार उभी आहे, आता अडचण अशी आहे की कारपर्यंत जाण्यासाठी पाण्यातून जावं लागेल आणि या तरुणाला त्याचे पाय भिजवायचे नाहीयेत. त्यामुळे तो डोकं लावून एक जुगाड करतो आणि एका पिशवीमध्ये पाय टाकतो. त्यानंतर तो तसाच उड्या मारत मारत कारमध्ये यशस्वीपणे जाऊन बसतो. मात्र पुढच्याच क्षणी असं काही होतं की याचा कुणीही विचार केलेला नसतो. तरुण कारमध्ये बसतो आणि दरवाजा बंद करणार तेव्हाच एक भरधाव वेगात येते आणि रस्त्यावरच संपूर्ण पाणी कारमध्ये बसलेल्या तरुणाच्या अंगावर उडवून जाते.

Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Elder man took female dog in toilet cruel video viral on social media
अरे जरा तरी लाज बाळगा! मादी श्वानाला शौचालयात नेलं अन्…, वृद्धाच्या विकृत कृत्याचा VIDEO व्हायरल
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आता उपमुख्यमंत्रीपद…
Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?

फक्त पाय भिजू नये म्हणून तरुणानं एवढा आटापिटा केला मात्र शेवटी तो संपूर्ण भिजला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>बस स्टॉपवर बसलेल्या तरुणावर ड्रायव्हारने घातली बस; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप; VIDEO पाहताना सावधान

सोशल मीडियावर हा व्हिडीओ attitude_marathi_dialogue_007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “तुम्ही कितीही हुशार असला तरी नशिबात आहे ते होणारच” असं लिहलं आहे. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”

Story img Loader