Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा प्रथितयश व्यक्तींच्या आत्महत्येच्या घटनांनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सुचत नाही. अशातच एका व्यक्तीने नोकरी गेल्याच्या तणावात आत्महत्येचा प्रयत्न केला. १२ व्या मजल्यावरून उडी मारण्यासाठी तो उभा राहिला अन् क्षणात… पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोएडामध्ये सोमवारी एका व्यक्तीने निवासी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इमारतीतील रहिवाशांनी लगेच जाऊन, त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याच सोसायटीतील रहिवाशांनी सुटका करण्यापूर्वी त्या व्यक्तीला १२ व्या मजल्यावरील बाल्कनीतून लटकल्याचे पाहिले. यावेळी नोकरी गेल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. नोकरी गेल्यानंतर झालेल्या त्रासामुळे त्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, रहिवाशांनी तत्परतेने कारवाई करीत त्याचा जीव वाचवला. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, तो माणूस १२ व्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारण्याच्या मार्गावर आहे; परंतु रहिवाशांनी वेळेवर पोहोचून त्याला मागून पकडले आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न थांबवला.

सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणारा भाडेकरू, नोकरी गेल्यानंतर मानसिक तणावाशी झुंजत होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या काळात आधार नसल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ही घटना टॉवरच्या विरुद्ध बाजूस असलेल्या एका इमारतीतून पाहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/tricitytoday/status/1848300998353395778

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी बंद ठेवण्यासाठी दुकान मालकानं सांगितली भन्नाट कारणं; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

नोकरी दुसरी मिळेल पण हे आयुष्य पुन्हा नाही

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या तरुणावर टीका केली आहे. एकाने म्हटलेय, “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” तर आणखी एकाने, “भावा, नोकरी दुसरी मिळेल; पण हे आयुष्य पुन्हा नाही” अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

जीवापेक्षा मोठं काहीही नाही

आपण सगळेच उदरनिर्वाहासाठी, आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी काहीतरी काम करीत असतो. व्यवसाय किंवा नोकरी करून आपण आयुष्य जगत असतो. परंतु, काही कारणांमुळे आपली नोकरी गेली, तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आर्थिक घटकांसोबत आपल्या मानसिक स्वास्थावरदेखील परिणाम होऊन मानसिक ताण येऊ शकतो. परिणामी डिप्रेशन, मूड स्विंग्स् अशा गोष्टी येणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र काहीही असले तरी आपल्या जीवापेक्षा मोठे काहीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video noida man attempts suicide after losing job rescued by residents while hanging from 12th floor balcony srk