आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी कोणावर वाईट प्रसंग ओढावून येईल याचीही खात्री नसते. काही जण या प्रसंगात जखमी होतात तर काही कायमचे आपला जीव गमावतात. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणं आणि सुरक्षित ठिकाणी राहून आपलं काम करणं हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे. पण तरीही अनेकदा कामाच्या नादात अनेकांकडून निष्काळजीपणा होतो आणि काहीजण आपल्या जीव धोक्यात घालतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका कर्मचाऱ्याचा टायरमध्ये हवा भरता भरता अपघात झाला. तो अपघात इतका भयंकर होता की तो जोरात जमिनीवर आदळला. नेमकं घडलं काय, जाणून घ्या…
हेही वाचा… ही कसली आई! चालत्या ट्रेनमध्ये मुलाच्या आयुष्याशी खेळली अन्…, पाहा महिलेचा थरारक VIDEO
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी टायरमध्ये हवा भरताना दिसतोय. पण टायरमध्ये हवा भरताना तो माणूस टायरवर बसून हवा भरत असतो. टायरमध्ये हवा भरता भरता टायर जोरात फुटतो आणि तो माणूस गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उडतो आणि जमिनीवर कोसळतो. हा अपघात होताच क्षणी त्याच्या मदतीला दोघेजण धावून येतात.
हा धक्कादायक व्हिडीओ @motiv.ationallionn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आयुष्यात कधीही टायरमध्ये अशी हवा भरू नये.” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर याला १ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
हेही वाचा… “अहो बोलणारी…”, तरुणाची ‘ही’ पाटी वाचून पोट धरून हसाल, मुलींनो लग्न करत असाल तर हा PHOTO एकदा पाहाच
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत सांगितलं की, “आमच्या इथे अशाच एका माणसाचा मृत्यू झाला.” तर दुसऱ्या युजरने बापरे, त्या माणसाबरोबर खूप वाईट झालं अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, नशीब तो सळीवर जाऊन पडला नाही, नाहीतर त्याचा भयंकर मृत्यू झाला असता.
हेही वाचा… जीव वाचवण्यासाठी ‘ती’ कचऱ्याच्या पिशवीत लपली; स्कूटरवरून दोघे जण आले अन्…, पाहा थक्क करणारा VIDEO