Shocking Video: घरात लहान मूल असलं की कायम त्याच्याकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं, कारण कधी कोणता वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. घरात लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांना लागू नये, ते मस्ती करता करता कुठे पडू नये यासाठी त्यांच्यामागे एक माणूस असतोच. अशा वेळेस अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांचा अपघात होतो. यात कधी गंभीर दुखापत होते तर कधी चिमुकल्यांचा जीवही जातो.

सध्या असाच काहीसा प्रकार एका घटनेत घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत अचानक एका ठिकाणी आग लागते आणि त्याचा भडका चिमुकलीच्या अंगावर उडतो. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…

हेही वाचा… VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, घराबाहेरील अंगणात अनेक जण जेवण बनवत असतात. तेवढ्यात एका ठिकाणी अचानक आगीचा भडका उडतो. याच अंगणात समोर एक चिमुकली खेळताना दिसतेय. आगीचा भडका होताच तो थेट चिमुकलीच्या अंगावर येतो. चिमुकलीवर आगीचा भडका उडाल्यावर तिच्या ड्रेसला आग लागते. हे पाहताच आजूबाजूची माणसं लगेच तिच्याजवळ जातात आणि आग विझवत तिला उचलून दुसरीकडे नेतात.

हा व्हिडीओ @nimbahera.update या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही तासांपूर्वीच शेअर करण्यात आला असून याला तब्बल २२ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

हेही वाचा… रस्त्यात तिला अडवलं अन्…, आधी कानाखाली मारलं मग जमिनीवर आदळलं, दुचाकीस्वाराने केला महिला कॉन्स्टेबलवर हल्ला! पाहा धक्कादायक VIDEO

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लहान मुलीला अशा ठिकाणी खेळायला देणं हेच चुकीचं आहे.” तर दुसऱ्याने, “नशीब त्याने लगेच मुलीला उचललं आणि आग विझवली” अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “पालक म्हणून मुलांना सुरक्षित वातावरणात ठेवणं त्यांची जबाबदारी आहे.”

Story img Loader