Shocking Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अगदी मजेशीर वाटतात, तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करतात. असे व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी बाब व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

आजकाल कधी कोणावर वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. काही जण या प्रसंगातून वेळच्या वेळी सावरतात आणि आपला जीव वाचवतात, तर काही जण घाबरून जाऊन कायमचे आपला जीव गमावतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा सरकत्या जिन्यांवर (एस्केलेटर) चढत असताना एक भयंकर अपघात होतो. त्याच्याबरोबर नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या.

एस्केलेटरवर अपघात (Boy’s head stuck into escalator)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगा आपल्या आईबरोबर मॉलमधील एस्केलेटर म्हणजेच स्वयंचलित जिन्यांवरून वरच्या दिशेने येताना दिसतोय. तेवढ्यात जिन्याच्या बाहेरील बाजूला तो मुलगा वाकून बघतो. वाकून बघत असताना अचानक त्याची मान एस्केलेटरमध्ये अडकते. त्याच्या आईचं लक्ष जाईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग लगेच तिथल्या कर्चाऱ्यांना त्याची आई मदतीला बोलावते. कर्मचारी येऊन ते एस्केलेटर बंद करतात आणि त्या मुलाला कसंबसं वाचवतात. नंतर मुलाला रुग्णालयात घेऊन जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @kingxchannel90 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल दोन मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर मुलाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यात त्या मुलाचीच चूक आहे, ” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आईने त्याला मारलं म्हणून तो अजून थोडा खाली गेला, नाहीतर कदाचित वाचला असता”, तर तिसऱ्याने “किती धक्कादायक घटना आहे ही” अशी कमेंट केली.