महिलांचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या असे संस्कार लहानपणीच अनेकांवर होतात. पण, वर्षानुवर्षे होणाऱ्या अत्याचारावरून काही लोक त्यांचे हे संस्कार विसरलेले दिसतायत. सगळ्याच गोष्टींचं भान विसरून काही लोक आपली मर्यादा ओलांडतात आणि महिलांवर अत्याचार करतात. मग यावेळेस ते कोणाचीही पर्वा करत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळा, कॉलेज, ऑफिस आणि अगदी घरातदेखील काही महिला असुरक्षित असतात. त्यांच्यावर होणारे अत्याचार काही जणी सहन करतात, तर काही जणी या अत्याचाराविरोधात आवाज उठवतात. सध्या अशीच घटना एका ऑफिसमध्ये घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ऑफिसमध्ये केलं महिलेबरोबर अश्लील वर्तन

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये ऑफिसमध्ये एक महिला तिच्या डेस्कवर काम करत आहे. आपल्या कामात व्यग्र असताना तिथे एक माणूस येतो आणि ते दोघं लॅपटॉपमध्ये बघून काहीतरी कामाचं बोलत असतात. कामाचं बोलत असताना तो अचानक तिच्या खांद्यावर हात ठेवतो हे बघताच ती लगेच मागे वळून बघते आणि त्याचा हात झटकते.

पुढे पुन्हा एकदा तो माणूस लॅपटॉपमध्ये बघून तिला प्रश्न विचारत असतो आणि ती लॅपटॉपमध्येच लक्ष देत त्याच्याशी संवाद साधत असते. तेवढ्यात पुन्हा एकदा तो आजूबाजूला एक नजर मारतो आणि दुसऱ्या खांद्यावर हात ठेवतो. त्याने खांद्यावर हात ठेवताच महिलेचा राग अनावर होतो आणि ती त्याचा हात झटकते आणि तिच्या बाजूला असलेल्या फाइल्स घेऊन त्याला मारते आणि आरडाओरडा करते. शेवटी आपल्या जागेवर बसून ती रडू लागते.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/nirosha_kanchipuram/reel/DEzX13bS6UD

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nirosha_kanchipuram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुलींची परिस्थिती” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपण कोणत्या समाजात राहतोय” तर दुसऱ्याने “धाडसी मुलगी, तू अगदी बरोबर केलंस, त्याला पोलिसांच्या ताब्यातही द्यायला पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “याला सोडायलाच नाही पाहिजे.”