Minor Girl Abuse Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीत.

अत्याचार करणारी विकृत माणसं स्वत:च्या मनाला वाटेल ते करतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुण एका लहान मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसतोय.

लहान मुलीबरोबर काय केलं पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा आपली मर्यादा ओलांडताना दिसतोय. एका लहान मुलीला जबरदस्तीने कुंकू लावत तिच्याशी लग्न करताना दिसतोय. तसंच तिला मिठी मारताना दिसतोय. व्हिडीओत स्पष्ट कळून येतंय की हा जो प्रकार सुरू आहे, तो जबरदस्तीने सुरू आहे. लहान मुलगी अक्षरश: जोरजोरात रडताना दिसतेय आणि याला नकार देताना दिसतेय. तरीही हा विकृत माणूस तिच्याबरोबर गैरवर्तणुक करताना दिसतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @prematil_athavana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “तू असं करू नकोस भाऊ, तुला मुलगी असती तर तू हे केलं असतं का?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा माणसांना भर चौकात फाशी दिली पाहिजे ” तर दुसऱ्याने “काय प्रकार आहे हा? माणूस विकृत होत चालला आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “तुझ्या आई बहिणीबरोबरदेखील असंच वागशील का रे” तर एकाने “अशा लोकांवर चांगलीच कारवाई झाली पाहिजे “अशी कमेंट केली.