एका विचित्र घटनेत, एका माणसाने जबरदस्तीने दुसऱ्या तरुणाला किस केल्याच्या आरोपाखाली ट्रेनमध्ये क्रूरपणे मारहाण करण्यात आली. ही घटना पीडित तरुणाने रेकॉर्ड केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, तो तरुण ट्रेनमध्ये त्याचे चुंबन घेणाऱ्या माणसाला भेटतो आणि नंतर त्याला त्याच्या सीटवरून खेचून मारहाण करतो.

तरुणाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सोशल व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, पीडित तरुण भरगच्च असलेल्या ट्रेनमध्ये त्याची जबरदस्तीने किस घेणाऱ्या माणसाला भेटतो. तो माणूस ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये खालच्या सीटवर बसलेला दिसतो. माणसाला दाखवत तरुण व्हिडीओ रेकॉर्ड करतो आणि म्हणतो, “मी ट्रेनमध्ये झोपलो होतो आणि या माणसाने सगळ्यांसमोर जबरदस्तीने मला किस केलं. मी यावर त्याला हेदेखील विचारलं की तू मला किस का केलंस तर हा माणूस म्हणाला, मला चांगलं वाटलं म्हणून केलं. आणि त्याची पत्नी या गोष्टीला समर्थन देतेय.”

तरुण पुढे असंही म्हणाला, “जर हे कोणत्या मुलीबरोबर घडलं असतं तर सगळ्यांनी यावरून आवाज उठवला असता.” तरुणाचं हे सगळं बोलणं सुरू असताना यावर आरोपी “चूक झाली” असं म्हणतो. त्याच्या या उत्तरावर तरुण संतप्त होऊन म्हणतो, “चूक झाली म्हणजे काय, इतके लोक इथे उभे आहेत पण कोणीच काही बोलत नाहीय.”

यानंतर तरुण आरोपीला सीटवरून उठायला सांगतो आणि मारहाणीवर उतरतो. पण त्याची पत्नी रडून तरुणाला अडवायचा प्रयत्न करत असते. तरीही तरुण त्याच्या कानाखाली मारत मारहाण करतो. यादरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

या प्रकरणासंदर्भात कोणत्याही पोलिस कारवाईचे वृत्त नाही. तसंच घटनेची नेमकी तारीख आणि वेळ देखील माहित नाही, तथापि, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ShoneeKapoor या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भावाने बरोबर केले, त्याने रेल्वे पोलिसांनाही बोलावायला हवे होते, उत्तर भारत, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या काही भागात अजूनही प्रवास करणे कठीण आहे, ही खरोखरच लज्जास्पद घटना आहे.” तर दुसऱ्याने “कलयुगात समाज खूप खालच्या पातळीवर उतरत चालला आहे” अशी कमेंट केली.

Story img Loader