Man Masturbates In Front Of Women: सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजूबाजूचं भान न राखता अशा विकृत मानसिकतेचे लोक आपली मनमानी, तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करतात. सध्या अशीच एक घटना एका रेल्वेस्थानकावर घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक वर्तनाबद्दल चिंता निर्माण केली आहे.
पश्चिम बंगालमधील बेगमपूर रेल्वेस्थानकावर एक माणूस हस्तमैथुन करीत असल्याचे दर्शविणारा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ रविवारी (१६ मार्च) इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तो माणूस दुसऱ्या बाजूला प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलांकडे पाहत हस्तमैथुन करताना दिसत आहे.
घटनेची माहिती
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पुरुष दिवसा प्लॅटफॉर्मवर हिरवा थॉब (सौदी अरेबियातील पुरुषांचा पारंपरिक पोशाख) घालून उभा आहे आणि हस्तमैथुन करीत आहे; तर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला महिला उभ्या असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ शनिवारी (१५ मार्च) पश्चिम बंगालमधील हुगळी येथील बेगमपूर रेल्वेस्थानकाचा असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @rajarshilahiri एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, इंटरनेट युजरने कॅप्शनद्वारे व्हिडीओची माहिती शेअर केली आणि म्हटले, “पश्चिम बंगाल, हुगळी, सिंगूर, बेगमपूर स्टेशन १५.०३.२०२५ सकाळी. तो काय करत आहे, कोणाला पाहत आहे हे समजण्याइतपत तुम्ही मोठे आहात. या मूर्खाला अटक करा.”
या घटनेमुळे रेल्वेस्थानकावरील सुरक्षेच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि इंटरनेट युजर्सने संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर भारतीय रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिले.
भारतीय रेल्वेची प्रतिक्रिया
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ईस्टर्न रेल्वे कोलकाता यांनी व्हिडीओला उत्तर दिले आणि म्हटले, “तुमची तक्रार प्राप्त झाली आहे आणि आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे ती पाठवण्यात आली आहे.”
रेल्वे सुरक्षा दलाच्या हावडा विभागाने सांगितले, “घटनेची नेमकी वेळ सांगता येत नाही. आम्ही स्टेशन परिसरात शोध घेतला; पण त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.”