Woman Strips Naked Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी काहीतरी नवीन पाहायला मिळतं. इंटरनेटवर व्हायरल होणारे व्हिडीओ जितके मजेशीर असतात तितकेच काही व्हिडीओ धक्कादायक आणि भीतीदायकदेखील असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक महिला नग्न अवस्थेत विमानतळावर सगळ्यांवर हल्ला करताना दिसतेय. नेमकं घडलंय काय, जाणून घेऊ…

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ मार्च रोजी एका मानसिक रुग्ण असलेल्या महिलेने नग्न होऊन अनेक लोकांवर हल्ला केल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. TMZच्या वृत्तानुसार, समांथा पाल्मा अशी ओळख पटवलेल्या महिलेने पेन्सिलने किमान दोन लोकांवर वार केले आणि तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेस्टॉरंट मॅनेजरचा तिने चावा घेतला.

अहवालानुसार, मॅनेजरने जेव्हा हस्तक्षेप केला तेव्हा समांथा पाल्माने त्याच्याच पेन्सिलने त्याच्यावर वार केल्याचा आरोप आहे. तिने मॅनेजरच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिने त्याच्या हातावर चावा घेतला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर गोंधळ घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती महिला विमानतळावर प्लाझ्मा स्क्रीन फोडताना दिसत आहे. ती काही लोकांवर पाणी फेकताना आणि विमानतळावर नग्न अवस्थेत धावतानाही दिसली.

तिला नग्न पाहून तिच्या मदतीसाठी कोट देणाऱ्या प्रवाशालाही तिने शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे. पोलिसांना ती टर्मिनल डीच्या गेट डी १ वर आपत्कालीन दरवाजामागे लपलेली दिसली. अहवालानुसार, महिलेच्या शरीरावर इतरांचे रक्त असल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि अटक केली. घटनेच्या वेळी ती तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत होती असे म्हटले जाते. समांथा पाल्मावर प्राणघातक शस्त्र वापरून गंभीर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिस कोठडीत पाल्माने त्या दिवशी तिचे औषध चुकल्याचे कबूल केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @unlimited_ls या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मानसिक रुग्ण महिलांची ही समस्या जगभर आहे, म्हणूनच पुरुषांनी नियंत्रणात राहणे आवश्यक आहे.” तर दुसऱ्याने “तिला चांगल्या मानसिक उपचारांची गरज आहे” अशी कमेंट केली.