Shocking Video Viral: सोशल मीडियावर रोजच्या रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येतो. सध्या सगळीकडेच धमकीचं, मनमानी करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत चाललं आहे. लोकांना सगळ्याच गोष्टी अगदी सहज आणि लतकर हव्या असतात. कोणत्याही गोष्टीसाठी ते वाट पाहायला तयार नसतात आणि त्यात काही विक्षिप्त माणसं मनमानी करून, घुसखोरी करून समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं थोडं थांबायला सांगताच तरुण चक्क तिच्या केबिनची काचच फोडतो. एवढंच नाही, तर काच फोडून तो तिच्या केबिनमध्ये घुसतो. नेमकं असं घडलं तरी काय ते पाहूया…

हेही वाचा… बापरे! पायऱ्यांवरून घसरत खाली आली अन्…., रेल्वे स्थानकावर महिलेला आली चक्कर, पण पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही राग होईल अनावर, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे. व्हिडीओ सुरू होताच आपण पाहू शकतो की, एक तरुण बँकेत काही कामासाठी आलेला असतो. एका महिला कर्मचाऱ्याच्या केबिनबाहेर तो उभा असताना महिला कर्मचारी त्याला म्हणते, “अर्ध्या तासानं या, सध्या लंच टाईम सुरू आहे.” हे ऐकताच तरुण संतापतो आणि रागाच्या भरात केबिनची काच जोरजोरात गुद्दे मारून फोडतो. काच फुटल्यानंतर तो तरुण चक्क तिथून कोबिनमध्ये शिरतो. तरुणाचा हा वेडेपणा पाहून महिला कर्मचारी घाबरते आणि तिथून पळ काढते.

हा व्हिडीओ @krm_status100k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “हे एसबीआयवाले नाही सुधारणार,” अशी कॅप्शन दिली आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल ४४.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळलेलं नाही.

हेही वाचा… चालत्या स्कूटरवरून खाली खेचलं अन्…, भररस्त्यात दोन विद्यार्थीनींचा राडा, एकमेकींच्या अंगावर बसून केली मारहाण, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “ते त्यांचं काम करीत आहेत. त्यांनादेखील जेवायला वेळ द्या.” दुसऱ्यानं हे अजिबात मजेशीर नाही, अशी कमेंट केली. तर अनेकांनी कमेंट्स करीत चक्क हल्लेखोराची बाजू घेतली आहे. “एकदम बरोबर केलंस भावा, व्हिडीओ पाहून मजा आली. भाऊ १,००० वेळा येऊन गेला असेल म्हणून त्याला राग आला असेल” अशा अनेक असंवेदनशील हीकमेंट्स या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of a young man broke the glass and entered the cabin of woman employee harassment video viral dvr