Viral funny video: दारू माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना तसं करताना पाहिलंही असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती दारू प्यायल्यानंतर अचानक ‘वाघ’ बनते आणि आकाशातील चंद्र-तारे तोडून आणण्याच्या फुशारक्या मारते. मात्र, दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही असे लोक दारू पिणे सोडत नाहीत. काही लोकांना त्याचे असे व्यसन लागते की, ते सोडणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब होऊन बसते. अशा वेळी काही लोक हेच व्यसन सोडविण्यासाठी एखाद्या केंद्रात, शिबिरात तर कधी कधी बुवा-बाबांकडेही जातात. दरम्यान, अशीच एक व्यक्ती आपली दारू सोडविण्यासाठी एका ‘बाबा’कडे आली असता, तिच्यासोबत काय घडले हे तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
अनेक जण दारुचे व्यसन सोडविण्यासाठी बरेच वेगवेगळे उपाय करतात. काहींचे कुटुंबीयही घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या या व्यसनाला कंटाळून त्याची दारू सोडविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांत बाबा-बुवांचीही मदत घेतात. असाच काहीसा हा प्रकार असून, एका दारूड्या व्यक्तीला दारू सोडविण्यासाठी एका बाबाकडे घेऊन आले असता, या बाबाने त्याला सळो की पळो करून सोडले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक स्वत:चे दारुचे व्यसन सोडून देतील. दारू सोडण्यासाठी या बाबाने अशी काही ट्रिक वापरली की, कुणी त्याबाबत विचारही केला नसेल. खरे तर या बाबाने एका मद्यपीला दारू प्यायल्यामुळे धडा शिकवला आहे. या बाबाने त्या मद्यपीला असा जबरदस्त चोप दिला की, त्या व्यक्तीला दिवसाही चंद्र-तारे दिसले असतील.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या बाबाने मद्यपीला समोर बसायला सांगितले. त्यानंतर त्याचे केस पकडून त्याची धुलाई केली. त्याचे केस पकडून एखाद्या आरोपीला पोलीस जसे फटकावतात तसे या बाबाने या मद्यपीच्या कानाखाली लगावल्याचे दिसत आहे. मधेच ते त्याला खाली वाकवून, त्याच्या पाठीवरही मारताना दिसत आहेत. दारू सोडविण्याचा असा उपाय तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: बिनभरवशाचं आयुष्य! हसत-खेळत काम करतानाच काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून, @ARSHAD_93900 नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी मात्र या संपूर्ण प्रकाराची मजा घेत आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने जाहिरातयुक्त संबोधन करीत म्हटले, “आमच्याकडे कितीही वर्षं दारूचं जुनं व्यसन असलं तरी ते एका फटक्यात सोडवून मिळेल.” तर आणखी एकाने म्हटलेय, “बिचाऱ्याचा इकडेच जीव जाईल.” तर तिसरा युजर म्हणतो, “कायमची दारू सोडवायची असल्यास या बाबांकडे जा.”