Viral video: बिबट्या हा अत्यंत चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीतही शिकार करू शकतो. तो अत्यंत चपळ असतो. त्यामुळे वेळप्रसंगी तो पाण्यात शिरून मगरीशी देखील दोन हात करण्याची क्षमता ठेवतो. मात्र एका बिबट्याला चक्क वानरांनी आव्हान दिलं. अन् आश्चर्याची बाब म्हणजे हा खतरनाक शिकारी वानरांसमोर हतबल झालेला दिसला.परिणामी जीव वाचवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. हा विचलीत करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका वानरानं जंगलातल्या चक्क बिबट्याला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.बिबट्याची दहशत फक्त जंगलातच नव्हे तर माणसांपर्यंतही पसरलेली आहे. बिबट्याला पाहतच लोकांच्या पायाखालची जमीन हादरते आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी उलटे पाय धरून पळू लागतात. तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. बिबट्याच्या थरारक शिकारीचे शिकारीचे व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एक अजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जंगलामधून जाणाऱ्या एका रस्त्यावरील पर्यटकांच्या वाहनातून शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या कारसमोर वानरांची एक टोळी बसल्याचं दिसत आहे. अचानक या टोळीतील प्रमुख वानर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिरक्या लाईनमध्ये आक्रमकपणे धावत जातो. नेमकं या वानाराला काय झालं हे कळण्याच्या आतच हे वानर कशासाठी धावलं हे समोर येतं. हे वानर त्याच्या टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला आडवं जातं. बरं हे वानर बिबट्याला आडवं जाणार याची जाणीव झाल्यानंतर या टोळीतील दुसरी वानरंही या बिबट्याच्या दिशेने धाव घेताना दिसतात. लिडर कसा असावा हे या व्हिडीओतून पाहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बिबट्यासाठी दु:ख व्यक्त केलंय. बिबट्या सारखा खतरनाक आणि चपळ प्राणी वानरांच्या तावडीत कसा सापडला? हाच प्रश्न अनेकांना पडलाय. शिवाय बिबबट्याची शिकार करणं इतकं पण सोपं काम नाही. त्यामुळे सर्वजण अवाक् झाले आहेत.