BAMS Student Attempts Bank Heist: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सध्या अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात रोख गमावल्यानंतर, शनिवारी भोपाळमध्ये बीएएमएसच्या विद्यार्थ्याने आपली थकबाकी परत मिळण्यासाठी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. पिपलानी परिसरात असलेल्या धनलक्ष्मी बँकेत विद्यार्थी मास्क घालून, मिरची स्प्रे बॉटल घेऊन आत घुसला. बँक कर्मचाऱ्यांना घाबरवण्याचा त्याचा डाव फसला. बँक कर्मचारी आणि ग्राहकांवर मिरचीचा स्प्रे मारल्यानंतर तो स्वत: घाबरला आणि पळून गेला. काही तासांतच त्याला अटक झाली.

अयशस्वी प्रयत्नानंतर त्याने यूट्यूब व्हिडीओंवरून लुटीची योजना आखल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून मिरचीचा फवारा आणि एअर पिस्तूल जप्त केले असून ते दोन्ही त्याने ऑनलाइन ऑर्डर केले होते.

American foreign girl married to indian man and shared her after marriage experience
सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Crocodile Viral Video crocodile froze while lying in the lake
VIDEO : कडाक्याची थंडी अन् जगण्यासाठी संघर्ष! गोठलेल्या तलावातील मगरीची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Shocking video girls in up baghpat fight over boyfriend on Road thrilling video went viral
प्रेमाचा हिंसक खेळ! कपडे फाटले तरी भान नाही; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा भर रस्त्यात तुफान राडा, VIDEO पाहून व्हाल हैराण
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
cheap makeup products viral video
रस्त्यावरून स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् खरेदी करणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO एकदा पाहाच; पुन्हा १० रुपयांची लिपस्टिक घेताना १०० वेळा कराल विचार

व्हायरल व्हिडीओ

FPJच्या वृत्तानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून नेटिझन्सनी यावर हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… मराठी माणसाचा नाद करायचा नाय! आजोबांनी विद्यार्थ्यांसमोर झाडलं इंग्रजी, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित

मिळालेल्या माहितीनुसार, या २४ वर्षीय आरोपीचे नाव संजय कुमार असून तो मूळचा उज्जैनचा रहिवासी आहे. संजय कुमार हा शहरातील एका खासगी महाविद्यालयातून बीएएमएसचे शिक्षण घेत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनलक्ष्मी बँकेतील कर्मचारी मनमोहन के यांनी पोलिसांना माहिती दिली की, हेल्मेट आणि मास्क घातलेला एक तरुण शुक्रवारी त्यांच्याकडे आला आणि बँक खाते उघडण्यासाठी भाडे करार (rent agreement) सादर केला. तेव्हा त्याला बॅंक कर्मचाऱ्याकडून नकार देण्यात आला आणि तो तिथून निघून गेला.

तोच तरुण दुपारी चारच्या सुमारास बँकेत परतला आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवर त्याने मिरची पावडर फवारली. बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांवर मिरची पावडर फवारताना तरुण कॅश काउंटरच्या दिशेने निघाला. मात्र, बँकेचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून तरुण घाबरला. बँकेच्या बाहेर जाऊन तो दुचाकीवरून पळून गेला.

हेही वाचा… चालत्या रिक्षातून महिलेने मारली उडी! दारूच्या नशेत ड्रायव्हरने तिला चुकीच्या ठिकाणी नेले अन्…; संतापजनक पोस्ट व्हायरल

सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून पोलिसांना काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले. आरोपीला अटक करण्यात आली असून, चौकशीला सुरुवात झाली आहे.

पोलिस चौकशी

संजय कुमारच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे दिसून आले की तो भोपाळमधील एका महाविद्यालयातून बीएएमएस (आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरीचा बॅचलर) करत होता. संजयला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आणि त्यातून कमाई करण्यासाठी त्याने मित्रांकडून रोख पैसे घेतले आणि त्याच्या फीचे पैसेदेखील वापरले, परंतु या गेममध्ये त्याने दोन लाखांहून अधिक रुपये गमावले. संजयने बँक लुटण्याचा बेत आखला आणि गुन्ह्याच्या प्लॅनिंगसाठी यूट्यूब सर्च केले आणि बँक कर्मचाऱ्यांवर मिरची पावडर वापरण्याची कल्पना त्याला सुचली. गुन्हा करण्यासाठी संजयने सुरक्षा रक्षक नसलेल्या बँकेची झडती घेतली.

एअर पिस्तूल जप्त

संजयच्या खोलीतून एअर पिस्तूल सापडल्याने पोलिस पथकाला धक्काच बसला. चौकशीत त्याने एअर पिस्तूल आणि मिरचीपूड ऑनलाइन मागवल्याचे उघड झाले. अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असण्याच्या शक्यतेच्या तपासण्यासाठी त्याची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader