Bike fell on the boy: सध्या अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. त्या संबंधित व्हिडीओही आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिले असतील. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा लहान मुलं रस्त्यावर पळत सुटतात किंवा अचानक त्यांची काही चूक नसताना त्यांच्या जीवावर बेततं. म्हणून लहान मुलांबरोबर नेहमी पालक असावेत किंवा कोणीतरी विश्वासू मोठी व्यक्ती असावी, असं अनेकदा सांगितलं जातं. लहान मुलंही खेळण्याच्या नादात आजूबाजूला बघत नाहीत आणि दुर्घटना होते. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत लहान मुलं खेळत असताना अचानक एका मुलाच्या अंगावर बाईक पडते. पुढे नेमकं काय घडतं, ते जाणून घ्या…

हेही वाचा… “जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान

बाईक पडली अन्…

व्हिडीओत रस्त्यावर तीन-चार लहान मुलं खेळताना दिसतायत. या रस्त्याच्या बाजूला एक बाईक पार्क केलेली असते. खेळता खेळता त्यातला एक मुलगा बाईकजवळ जातो आणि त्याचा धक्का लागताच बाईक त्याच्या अंगावर पडते. बाईकखाली दबून गेलेल्या आपल्या मित्राला वाचविण्यासाठी तिथली मुलं सैरावैरा पळतात आणि मदतीसाठी मोठ्या माणसांचा शोध घेतात. तेवढ्यात तिथे एक महिला व एक पुरुष येतो आणि बाईक उचलण्यास मदत करतो. बाईक उचलताच तो मुलगा बाहेर येतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bikelover_h1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “लहान मुलाच्या अंगावर पडली बुलेट” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याला तब्बल २२ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “बाईक चुकीच्या मार्गानं उभी केली आहे.” तर दुसऱ्यानं “पालकांचं लक्ष कुठे असतं?” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “नशीब वेळेत मदतीला धावून आले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of bike fell on boy accident viral video on social media dvr