Bride Shocking Video: लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न समारंभ अगदी आनंदात साजरा केला जातो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं.

आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात. पण जर लग्नातच वधूने काही विचित्र प्रकार केला तर… सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भरलग्नात नववधूने जे केलं ते पाहून नवरदेवाला घामच फुटला.

नवरीचा व्हायरल व्हिडीओ (Bride Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये भरमंडपात नवरीनं जे केलं, ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. स्टेजवर सगळे विधी सुरू असताना अचानक नवरीनं धक्कादायक कृत्य केलं, जे पाहून नवरदेवही घाबरला. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्टेजवरील खुर्चीवर बघून नववधू अचानक विचित्र प्रकारे हसू लागते. तिच्या आजूबाजूला कुटुंबातील अनेक माणसं उभी असतात. तिच्या खुर्चीच्या मागेदेखील एक तरुण उभा असतो, तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण, ती कोणाचंही न ऐकता अगदी जोरजोरात हसू लागते. एवढचं नाही, तर ती अचानक जोरजोरात आपलं डोकं हलवून किंचाळते. केस सोडून ती विचित्र प्रकार करू लागते.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mission_par_hu या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पूरा दुल्हा समाज डरा हुआ है (पूर्ण नवरदेव समाज घाबरला आहे), अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १८.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

नव्या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तिला दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करायचं असेल म्हणून तिनं असं केलं असेल”. दुसऱ्यानं, “लग्नापासून वाचण्यासाठी तिनं हा प्रकार केला असावा”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “तिच्यावर हसू नका. तिला काहीतरी प्रॉब्लेमदेखील असू शकतो”.