माणूस आणि प्राण्यांचं नातं अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यापेक्षाही प्राणी माणसांना जास्त जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.
आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले तर ते कोणालाही ऐकत नाहीत. प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
ह
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका दुकानात बैल शिरल्याने दोन मित्रांची तारांबळ उडालेली असते. दुकानाचं शटर थोडं उघडं असल्याने दोन मित्र शटरच्या बाहेरून बैल नेमका काय करतोय हे बघत असतात. बैलाला दुकानातून हकलवण्यासाठी एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की, “अरे घूस, काही नाही करत” असं म्हणून दुसरा मित्र थोडसं शटर खोलून आत जातो.
दुकानात जाताच तो बैलासमोर उभा राहतो. बैल दोन पावले मागे जातो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जोरात धावत येतो. नशिबाने तो माणूस मागे सरकतो आणि आपला जीव वाचवतो. बैलाचा रुद्रावतार पाहून घाबरगुंडी उडालेला मित्र जोरात शटर उघड असं ओरडतो आणि आपला जीव वाचवत तिथून बाहेर पळ काढतो.
हा व्हिडीओ @vk_reacts_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अरे घूस, काही नाही करत” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भाऊ थोडक्यात वाचला”, तर दुसऱ्याने “या बाबतीत मित्रांवर विश्वास ठेवायचा नाही” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “इसे कहते है मौत को छू कर टक से वापस आना.”