Shocking video: पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? तिखट-आंबट-गोड पाणी आणि रगडा असं कॉम्बिनेशन असलेली ही पाणीपुरी दिसताच अनेकांच्या तोंडालाच पाणी सुटतं. जेव्हा कधी जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले, किंवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा डोळ्यासमोर पहिले नाव येते ते पाणीपुरीचे. कोणीही असो पाणीपुरीचे नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी देशात विविध नावांनी ओळखली जाणारी ही पाणीपुरी तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळते. स्वच्छतेच्या कारणास्तव बाजारात मिळणारी पाणीपुरी अनेकदा खाण्याचे टाळली जाते. याआधीही अनेकदा पाणीपुरीच्या अस्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत, अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. त्यामुळे पुणेकरांनो यापुढे पाणीपुरी खाताना सावधान..हा व्हिडीओ पाहून तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच किळस आणणारा प्रकार घडला आहे. 

पुण्यामध्ये पाणीपुरी खाताना पाणीपुरीच्या पाण्यात झुरळ असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे, यावेळी पाणीपुरी बनवणाऱ्या व्यक्तीने उडवा उडवीची उत्तरे दिल्याचेही म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी पाणीपुरी खात आहेत यावेळी त्याना पाणीपुरीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं. यावेळी त्यांनी पाणीपुरी विक्रेत्याला ते झुरळ असल्याचं सांगितलं, त्यानंतर तो पाण्यात ते शोधू लागला. त्यानंतर या तरुणीनं पाण्यातून झुरळ काढून त्याला दिलं. त्यानंतर दोघीही तरुणी पाणीपुरी विक्रेत्याला ते खराब पाणी फेकून देण्यासाठी सांगत आहेत, मात्र तो यावेळी उडवा उडवीची उत्तरं देत आहे. अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळच सुरु असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे बाहेरचं खाताना शंभर वेळा विचार कराल.

पाहा व्हिडीओ

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र समोर आलेला हा प्रकार खरंच भयंकर आहे.