Dadar station chori video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स रिल्स तर कधी स्टंट व्हिडिओ, कधी जुगाड तर कधी भांडणाचे व्हिडिओ. याशिवाय चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असले की, चोरांचे प्लॅन बऱ्याचदा फसतात. अनेकदा चोरी करायला गेल्यावर ते स्वत:च मार खाऊन येतात किंवा असे काही तरी घडते की त्यांना चोरीचे सामान तिथेच सोडून जावे लागते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चोराला रंगेहात पकडलं आहे.
मुंबई शहरातील सर्वात गजबजलेले आणि गर्दी असणारं स्टेशन अशी दादर रेल्वे स्थानकाची ओखळ आहे. कोणत्याही वेळेला दादर रेल्वे स्थानकावर गर्दी पहायला मिळते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे २४ तास पोलिस तैनात असतात. आता मात्र, या गर्दीवर कायस्वरुपी तोगडा मात्र निघत नाही. याच गर्दीचा फायदा घेत चोर हातसफाइ करतात, याचाच फटका रोज हजारो पर्यटकांना बसतो. सध्या सोशल मीडियावर दादर स्टेशनवरील असाच एका चोराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चोरी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला गंभीर शिक्षा होऊ शकते. मात्र हे माहित असताना देखील काही लोकं झटपट पैसे कमावण्याच्या इराद्यानं चोरीचा रस्ता निवडतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दादर स्टेशनवरचा हा व्हिडीओ असून एक चोर चोरी करत असताना पकडला गेला आहे. दोन तरुणांनी त्याला रंगेहात पकडलं असून त्याला आता धरून ठेवलं आहे. मात्र तो चारी केली हे मान्यच करायला तयार नाही. तो स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता मात्र या तरुणांनी त्याला पकडून ठेवल्याचं दिसत आहे. तसेच त्याला चोरी का केली याचा जाबही विचारत आहेत. मात्र हा चोर इतका चलाख निघाला की त्यानं थेट खिशातून ब्लेड काढलं आणि तरुणांवर हल्ला करायला सुरुवात केली. यावेळी तरुणांच्या हातून तो निसटला आणि पळ काढला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या dalimss_news इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नोटकरीही संतापले असून रोज अशा गोष्टींना सामोरे जावं लागत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. दादर सारख्या गजबजलेल्या स्टेशवर चोरी करणं हे चोरांसाठी डाव्या हातचं काम झालं आहे. अनेकदा कारवाई करुनही या घटना कमी होताना दिसत नाहीत