Shocking Video:सासू आणि सूनेचं नातं अगदी वेगळं असतं. अनेकदा मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये कधी खाष्ट सासू दाखवली जाते तर कधी प्रेमळ सासू. खऱ्या आयुष्यातही असंच काहीसं असतं. सासू सुनेच्या नात्यात जेवढे खटके उडतात तेवढंच प्रेम आदरही असतो. पण, अनेकदा या नात्यांमध्ये कोणीतरी वरचढ ठरतं आणि वादाला सुरुवात होते. अशा वादात अनेकदा शाब्दिक भांडणं तर होतातच.
अनेकदा सुनेचा सासूकडून छळ होतो असंही आपण ऐकतो, पण काही सुना साधी माणुसकीही बाळगत नाहीत आणि आपल्या सासूच्या साधेपणाचा फायदा घेतात आणि सासवांचाच छळ करतात. सध्या अशीच एक भयंकर घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुनेने सासूबरोबर नेमकं काय केलं, जाणून घ्या…
सूनेने केला सासूचा छळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये सून सासूचा छळ करताना दिसतेय. या धक्कादायक व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सून आपल्या सासूला खूप मारहाण करत आहे. पायऱ्यावंर आपटत ती सासूला खाली पाडते. सासूचा इतका छळ केल्यानंतर ती तिथून निघून जाते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vikram.verma.710667 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बहू ने सास के साथ किया ऐसा, जिसे देख दिल दहल जाएगा” (सुनेने सासूबरोबर असं काही केलं की, पाहून धक्का बसेल) अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल आठ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर न्यायाधीशांनी सूनेला तुरुंगात पाठवले की सासूला, हे मला जाणून घ्यायचे आहे.” तर दुसऱ्याने “देव सर्व पाहत आहे, तुमच्या बाबतीतही असेच घडेल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ” म्हणून सून कधीच मुलगी होऊ शकत नाही”