माणसांचं आणि श्वानांचं नातं अगदी खास असतं. निष्ठावंत प्राणी म्हणून श्वानाची ओळख आहे. तसंच श्वानांचं पालकत्व स्वीकारलेली लोकंही त्यांना खूप जीव लावतात. त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात.

जितकं माणसं श्वानांवर प्रेम करतात त्याच्या दुप्पट श्वानांचं माणसांवर प्रेम असतं आणि ते त्यांच्या कृतीतून नेहमी कळून येतं. श्वान आपल्या माणसांसाठी हवं ते करायला तयार असतात. अगदी आपला जीव गेला तरी ते मागे पुढे पाहत नाहीत, म्हणूनच श्वानाला प्रामाणिक प्राणी अशी उपमा मिळते. सध्या अशाच एका श्वानाच्या प्रामाणिकपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जिथे श्वानाने आपल्या जीवाची पर्वा न करता लहान मुलीचा जीव वाचवला. नेमकं काय घडलं जाणून घ्या…

Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

मुलीचं अपहरण करणार इतक्यात…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका ठिकाणी एक लहान मुलगी उभी आहे, तसंच तिथे एक श्वानदेखील आहे. अचानक तिथे असलेल्या गेटमधून एक अनोळखी व्यक्ती येते आणि त्या मुलीला उचलून तिचं अपहरण करण्याच्या विचारात असते. पण, त्या व्यक्तीचा हा प्लॅन फिसकटून जातो, जेव्हा तिथला श्वान मुलीच्या मदतीला धावून येतो.

हेही वाचा… …म्हणून प्रत्येकाच्या घरी लेक असावी! लहान मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा VIDEO

अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलताच श्वान त्याच्या अंगावर धावून जातो. त्याच्या हाताचा चावा घेतो आणि त्याला घट्ट पकडून राहतो. श्वानाने पकडल्यामुळे अपहरणकर्ता घाबरून जातो आणि आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो, पण कितीही प्रयत्न केले तरी श्वान त्याची पकड घट्ट पकडून राहतो.

लहान मुलीच्या अपहरणाचा हा धक्कादायक व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “श्वानाच्या हुशारीमुळे एका लहान मुलीचा जीव कसा वाचला ते पाहा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे; तर व्हिडीओ व्हायरल होताच याला २५.७ इतके व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… काकांचा नाद करायचा नाही ! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “माणसांपेक्षा प्राणीच चांगले.” तर दुसऱ्याने “प्राण्यांएवढी माया आणि प्रेम कोणीच करत नाही,” अशी कमेंट केली.

Story img Loader