सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात एक माणूस गाडी चालवता चालवता थेट रेल्वे रुळावर गेला. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…

दारूच्या नशेत रेल्वे ट्रॅकवर चालवली गाडी

एका व्यक्तीने दारूच्या नशेत ५० मीटरपर्यंत रेल्वे ट्रॅकवर आपली कार चालवली. गाडी रुळांवर अडकल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्याच्या लक्षात आले आणि त्यांनी चालकाकडे धाव घेतली.

Richest Female YouTubers In India
अपूर्वा मुखिजाच्या वादानंतर श्रीमंत महिला युट्यूबर्स चर्चेत; श्रुती अर्जून आनंद, कोमल पांडे यांच्याबद्दल जाणून घ्या
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Girl dancing in Front of the crowd mother came and started beating her badly funny video
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Brother Sister VIRAL Video
“कमाल भावा!” बहिणीला गाण्यात साथ देण्यासाठी स्टेजवर आला अन् असा गायला की…; पाहा सुंदर VIDEO
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Elon Musk Vs Sam Altman
Sam Altman : “आम्हीच ट्विटर विकत घेतो”; इलॉन मस्क यांच्या ऑफरवर सॅम अल्टमन यांची प्रति ऑफर
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

रेल्वे रुळावर गाडी अडकून राहिल्याने रेल्वे अधिकारी कारजवळ आले आणि चालकाला याबद्दल विचारणा केली. रेल्वे अधिकारी म्हणाला, “तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही फाटकवरून किती दूर आला आहात”.

यावर चालक म्हणला, “गाडी स्पीडमध्ये होती.” यावर संतप्त होऊन अधिकारी म्हणाला, “असली कसली स्पीड, या स्पीडमध्ये गाडी चालवलीस तर अपघात होऊ शकतो.”

यानंतर अधिकाऱ्याने चालकाला आणि कारमधील इतर माणसांना बाहेर येण्यास सांगितले. तसंच “तुम्ही इतक्या स्पीडमध्ये आलात की, मला वाटतं, फाटकचा दरवाजा बंद असता तर तो तोडून तुम्ही आला असता.” असंही रेल्वे अधिकारी चालकाला म्हणाला.

गाडी रुळावर अडकून राहिल्याने अपघात टाळण्यासाठी मालगाडी ३५ मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना सूचना दिली मात्र चालक आणि चार प्रवासी आधीच घटनास्थळावरून निघून गेले होते. तसंच क्रेन वापरून कार काढण्यात आली आणि नंतर अधिकाऱ्यांनी चालकाला ताब्यात घेऊन कार ताब्यात घेतली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी अमरोहा उत्तर प्रदेश येथे घडली.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @brut.india या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दारूच्या नशेत असलेल्या एका चालकाने त्याची गाडी चालवत थेट रेल्वे रुळावर आणली” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.८ व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कोणत्या प्रकारचा नशा करतात हे लोक” तर दुसऱ्याने “” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ” त्याने ट्रेनमधील सर्व लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. त्याचा परवाना कायमचा निलंबित करा आणि त्याला तुरुंगात टाका.”

Story img Loader