Drunk man enters women’s coach Mumbai local video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यात महिलांच्या डब्यातही रोजच्या रोज भांडण पाहायला मिळतात. पण अनेकदा महिलांना त्यांच्याच डब्यात सुरक्षित वाटत नाही. अनेकदा काही पुरुष आपलीच ट्रेन समजून महिलांच्या डब्यात चढतात आणि त्यांना त्रास देतात. सध्या अशीच एक घटना मुंबईतील चुनाभट्टीत घडलीय. जिथे एक माणूस दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात चढला.
व्हायरल व्हिडीओ
चुनाभट्टी स्टेशनवर एका दारूच्या नशेत असणाऱ्या माणसाने महिलांच्या गाडीत प्रवेश केला. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या महिलेने त्या माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार महिलेने त्या पुरूषावर ट्रेनमध्ये ड्रग्ज घेतल्याचा आरोपही केला.
महिलेच्या पोस्टनुसार, तो माणूस सकाळी ८ वाजता ट्रेनमधील महिलांच्या डब्यात घुसला. तो माणूस ट्रेनमध्ये फिरू लागला. त्या महिलेने पुढे सांगितले की तो त्याच्या खिशात ठेवलेल्या कापडाचा तो वास घेत होता. कोचमधील महिलांनी त्याला दाराजवळ उभे राहण्यास सांगितले आणि पुढच्या स्टेशनवर, जीटीबी नगर स्टेशन होते, उतरण्यास सांगितले. रेल्वे सेवेने सोशल मीडिया पोस्टवर संपर्क साधला आणि केंद्रीय रेल्वे संरक्षण दलाला या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “चुनाभट्टी स्टेशनवर दारू प्यायलेल्या माणसाने महिलांच्या डब्यात घुसखोरी केली.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नशेत असणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याच्या दोन कानशिलात लगावून द्या, सगळी नशा उतरून जाईल किंवा महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलवा.” तर दुसऱ्याने “अशा वेळी महिलांनी स्टेशन आल्यावर चेन ओढवी व पोलिसांना सांगावे. फक्त व्हिडिओ काढून त्या वेळेस तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “या अशा घटना आजकाल खूप वाढत चालल्या आहेत.”