Shocking Video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. रोज वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. अनेक देशांमध्ये तरुणी असो वा विवाहीत महिला पुरुषांच्या गैरवर्तनाचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले असून पण अजूनही नराधम वठणीस येतं नाही आहेत.

सध्या असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीतून सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणीला एका मद्यधुंद तरुणानं स्पर्श केल्याचा तिने आरोप केला आहे. एवढंच नाहीतर चल येतेस अशा अश्लील शब्दात तो तिच्याशी बोलत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दिल्लीतील शिवाजी एन्क्लेव्ह मार्केटजवळ रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून मंगळवारी रात्री घरी परतत असताना एका मद्यधुंद पुरूषाने तरुणीच्या मागे जाऊन तिला स्पर्श केल्याचा आरोप एका तरुणीनं केला आहे.

तरुणीला केला अश्लील स्पर्श

भावना शर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणीने सोशल मीडियावर घडलेल्या घटनेची कहाणी सांगितली आणि जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचे सांगितले. भावना शर्माने दिल्लीतील रस्त्यांवर तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मद्यधुंद पुरूष रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या काही गाड्यांजवळ बसून सिगारेट ओढताना दिसत आहे. तरुणी त्याच्याकडे बोट दाखवत त्याने अंधारात तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असं सागताना दिसतेय.

व्हिडीओमध्ये तरुणी घटनेबद्दल सांगताना म्हणते, “मी घरी जात आहे. रात्रीचे ९ वाजले आहेत. आणि मागून एक माणूस आला आणि त्याने मला अश्लील स्पर्श केला. मी एक शब्दही उच्चारू शकले नाही”, असं ती म्हणाली.

त्याने अचानक आणि अयोग्य स्पर्श केल्याने तिला इतका धक्का बसला की तिने थोडं सावरून त्याला विचारले, “तू काय करतोयस?” तिला पुढे काय बोलावे हे कळत नव्हते. म्हणून ती थेट पोलिसांकडे गेली. असे शर्माने तिच्या इंस्टाग्राम रीलमध्ये शेअर केले.

तिने नमूद केलं की ज्या अज्ञात पुरूषाने तिला स्पर्श केला त्याला तिने तक्रार करतेय असं म्हटल्यावरदेखील कोणताही पश्चात्ताप किंवा कायदेशीर परिणामांची भीती नव्हती. “उसे कोई डर नहीं है. (त्याला कशाचीही भीती नाही)”, ती म्हणाली.

तसंच तरुणी पुढे म्हणाली, “जेव्हा मी त्याचा व्हिडिओ बनवत होते, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती की – तुम्हाला जे करायचे ते करा. मी तुरुंगात जाईन आणि परत येईन… त्याच्यासाठी तुरुंग म्हणजे गावातील घरी जाऊन परत येण्यासारखे आहे”.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @thefeelingsharma या इन्स्टाग्राम दरम्यान ही घटना मंगळवारी रात्री (८ एप्रिल) ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.