पोलिसांचं काम म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. चोरी, दरोडा अशा प्रकारचे अनेक गुन्हे रोखण्यासह राज्यात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीदेखील पोलिसांवर असते. महिलांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी अनेक महिला पोलीस अधिकारी तैनात असतात. पण, रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच जर त्रास दिला तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्याच पत्नीचा भररस्त्यात छळ केला.

पोलिसांचा गणवेश घातलेला एक मद्यधुंद पुरूष एका महिलेला त्रास देत असल्याचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर, तो पुरूष उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले तसेच ज्या महिलेवर अत्याचार झाला आहे ती त्याची पत्नी असल्याचेदेखील उघड झाले आहे. पोलिस विभागाने उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडली. उपनिरीक्षक कासगंज पोलिसात काम करतात. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संतापजनक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, उपनिरीक्षक त्याच्या पत्नीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करताना दिसत आहे. ही घटना एका बसस्टॉपवर घडली आहे.

पोलिस त्या महिलेला वारंवार स्पर्श करताना आणि तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की त्याची पत्नी अस्वस्थ आहे आणि सार्वजनिक ठिकाणी त्याने अनुचित वर्तन सुरू असल्याने ती घाबरलेली देखील दिसतेय. पण पोलिस यावरच थांबत नाही. एका क्षणी, तो कॅमेऱ्याकडेदेखील पाहतो आणि त्याला असे वाटते की त्याला त्याच्या अशा विचित्र वर्तनाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जात आहे तरीही तो आपले विचित्र वर्तन थांबवत नाही. तसंच तो नशेद धुंद असल्याचंदेखील या व्हिडीओवरून दिसून येतंय.

कासगंज पोलिसांनी बुधवारी एक व्हिडिओ निवेदन जारी केले आणि पुढील चौकशी आणि कारवाई होईपर्यंत उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.

पोलिसाचा हा व्हिडीओ @Dimpi77806999 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “युपी पोलिस हे खरे आहे का” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला पोलिस दलातून काढून टाकले पाहिजे.”तर दुसऱ्याने “या पोलिसावर त्वरित कारवाई केली गेली पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशा पोलिसांना फक्त निलंबित करणे पुरेसे नाही. कारण त्यांची फक्त कुठेतरी बदली होते आणि ते त्यांचे अश्लील वर्तन चालू ठेवतात.” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “स्वत:च्या बायकोला नाही सोडलं तर, आपली काय रक्षा करणार”